शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाडी सुरू करण्याचे आश्वासन हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

गोंदिया-डोंगरगड दरम्यान दुपारी ११ वाजतापासून तर सायंकाळी ६ वाजतापर्यंत एकही लोकल रेल्वे गाडी नाही. विशेष म्हणजे, अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर लोकल गाडीची सोय उपलब्ध नसल्याने आमगाव व सालेकसा तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या मागील अनेक वर्षांपासून कायम आहे.

ठळक मुद्देखासदारांना पडला आश्वासनाचा विसर : प्रवाशांची समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : निवडून येताच १५ दिवसांच्या आत गोंदिया-डोंगरगड दरम्यान दुपार पाळीत लोकल रेल्वे गाडी सुरू करुन देऊ असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले होते. परंतु १०० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही रेल्वे गाडी सुरु करण्यासाठी कुठल्याच हालचाली नाहीत. त्यामुळे या भागातील जनता ‘क्या हुआ तेरा वादा’ असा सवाल करीत आहे.गोंदिया-डोंगरगड दरम्यान दुपारी ११ वाजतापासून तर सायंकाळी ६ वाजतापर्यंत एकही लोकल रेल्वे गाडी नाही. विशेष म्हणजे, अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर लोकल गाडीची सोय उपलब्ध नसल्याने आमगाव व सालेकसा तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जनतेच्या मागणीनुसार प्रवासी गाड्यांची गरजेनुसार सोय करुन देणे आवश्यक आहे. डोंगरगड-गोंदिया दरम्यान चालणाऱ्या लोकल गाड्या बहुतेक दुर्ग आणि इतवारी या मार्गावर चालणाऱ्या असतात. यातील काही गाड्या गोंदियापर्यंत तर काही गाड्या डोंगरगडपर्यंतच चालतात. परिणामी सालेकसा, आमगाव, डोंगरगढ परिसरातील प्रवाशांचा विचार करुन दुपारी १ किंवा दोन वाजताच्या दरम्यान दोन्ही बाजूने रेल्वे गाडीची सोय झाली तर हजारो प्रवाशांना याचा लाभ होईल.रेल्वे विभाग केंद्र शासनातंर्गत येत असून रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. अशात केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदारांची ही पहिली जबाबदारी ठरते, ही बाब लक्षात घेता लोक मागील अनेक वर्षांपासून खासदारांकडे यासाठी मागणी करीत आहे. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र गडचिरोली लोकसभा क्षेत्रात समाविष्ट आहे. मागील १० वर्षांपासून या क्षेत्रातील जनतेची नाळ खासदारांसोबत कधीच जुळली नाही. त्यामुळे सुद्धा समस्या कायम आहे. या परिसरात लोकल रेल्वे गाडी सुरु करण्यासह रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांची समस्या ही कायम आहे. धानोली ते बाम्हणी मार्ग, दरेकसा ते भर्रीटोला मार्ग मागील ५० वर्षांपासून तशीच आहे.या समस्या जतनेने वेळोवेळी लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या, मात्र त्या अद्यापही मार्गी लागल्या नाही. विद्यमान खासदार नेते यांनी सुद्धा लोकल रेल्वे गाडी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १०० दिवसांचा कालावधी लोटूनही ही समस्या मार्गी लागली नाही.खासदार साहेब नेहमी संपर्काबाहेरसालेकसा-आमगाव तालुक्यातील लोक आपल्या समस्या सोडविण्यासाठी जेव्हा-जेव्हा खासदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा-तेव्हा खासदार महोदय संपर्काच्या बाहेर असतात. फोन लावला तरी उचलत नाही. त्यांच्या स्वीय सहायकाला संपर्क केला तर त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळत नाही.निवडून आल्यानंतर सालेकसा-आमगाव येथे सत्काराप्रसंगी खासदारांनी जाहीर सभेत बोलताना रेल्वेची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आतापर्यंत काहीच केले नाही. लोकांना आपल्या मागणीसाठी आता आंदोलन करावेच लागेल.-सुनील असाटी,सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते