शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पथसंचालनाची कमान महिलांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 21:25 IST

यंदा १ मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात संपूर्ण पथसंचालनाची कमान महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला लोकप्रतिनिधी व समाज सेविकांना प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देदिलीप भुजबळ पाटील यांचा पुढाकार : विद्यार्थिनींना देणार आत्मरक्षणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा १ मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात संपूर्ण पथसंचालनाची कमान महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला लोकप्रतिनिधी व समाज सेविकांना प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी घेतला आहे. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.महिलांनी त्यांच्या कार्य कर्तुत्वाच्या बळावर सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. शिवाय कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नसल्याचे त्यांच्या कौशल्यातून दाखवून दिले आहे. मात्र अद्यापही महिलांना काही ठिकाणी दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ पाटील यांनी हीच बाब हेरून महिलांचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक बळकट करण्यासाठी १ मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात पथसंचालनासह कार्यक्रमाच्या सर्वच आयोजनाची जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाºयांकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे यंदा १ मे महाराष्ट्र दिनी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी पथसंचालन करताना दिसणार आहेत.या कार्यक्रमाला महिला लोकप्रतिनिधी, समाजसेविका व विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत केले आहे. तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनीना आत्मरक्षणाचे धडे देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक भुजबळ पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस