शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एका जागेसाठी १० उमेद्वारंची लेखी परीक्षा! ११०० उमेद्वारांची निवड, १५ जुलैला परीक्षा

By नरेश रहिले | Updated: July 10, 2024 20:49 IST

गोंदिया जिल्ह्यातील ११० जागांसाठी १९ जून ते ५ जुलै २०२४ पर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे.

गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेल्या एकुण ११० पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये एका जागेसाठी १० उमेद्वारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी ११० जागा गोंदिया जिल्ह्यात असून यासाठी ११०० उमेद्वारांची निवड लेखी परीक्षेसाठी करण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ११० जागांसाठी १९ जून ते ५ जुलै २०२४ पर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या आधारे महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील नियम ४ (२) नुसार शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबधीत प्रर्वगामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी निवड यादी पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथील नोटीस बोर्डवर तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी दिली आहे.

आक्षेप नोंदविण्याचा आज शेवटचा दिवसलेखी परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेद्वारांची यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीत कुणाला हरकती/आक्षेप असल्यास त्यांनी पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या कार्यालयाचे ईमेल sp.gondia@mahapolice.gov.in यावर लेखी स्वरुपात ११ जुलै २०२४ च्या रात्री ८ वाजतापर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. त्यानंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती/आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, असे पोलिस विभागाने कळविले आहे.

फुलचूरच्या आयटीआय येथे होणार लेखी परीक्षा११० पदांसाठी होणाऱ्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा औद्योगीक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), फुलचुर पेठ, गोंदिया येथे १५ जुलै २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी हॉल टिकीटसह लेखी परीक्षेकरीता दुपारी १:३० वाजता प्रत्यक्ष हजर राहावे, असे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसexamपरीक्षा