शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

डेल्टापेक्षा भयंकर विषाणूने वाढविली चिंता, १५४ गावे लसवंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील १५४ गावांतील नागरिकांनी लसीचा पहिला  डोस शंभर टक्के घेतला असून, ही गावे लसवंत झाली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८९.५० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३४ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. लसीचा पहिला डोस घेण्यापासून वंचित असलेल्या ११ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. ओमयाक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढविण्यावर भर दिला जात आहे.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनाची दुसरी लाट ओसरून परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच दक्षिण ऑफ्रिकेतील ओमयाक्रॉन या नवीन विषाणूने जगभराची झोप उडविली आहे. केंद्र व राज्य सरकारने याची गांर्भीयाने दखल घेतली असून सर्वांनाच अलर्ट राहण्याच्या सूचना करीत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. राज्य शासनाच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुद्धा सजग झाली आहे. नव्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी डबल मास्कचा वापर, वांरवार हात स्वच्छ धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण या गोष्टींकडे लक्ष देण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या १०० टक्के लसवंत गावांची संख्या वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रयत्न सुरू केले आहे. जिल्ह्यातील १५४ गावांतील नागरिकांनी लसीचा पहिला  डोस शंभर टक्के घेतला असून, ही गावे लसवंत झाली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८९.५० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३४ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. लसीचा पहिला डोस घेण्यापासून वंचित असलेल्या ११ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. ओमयाक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढविण्यावर भर दिला जात आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन कापसे यांनी केले आहे. 

अशी आहेत लक्षणे...nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, कोरडा खोकला आणि थकवा. nकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या तीव्र लक्षणांमध्ये छातीत दुखणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणांचा समावेश आहे. याशिवाय त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी व अतिसार यांचा समावेश आहे. 

विदेशातून आले तर व्हावे लागेल क्वारंटाईन nदक्षिण आफ्रिकेत डेल्टा पेक्षाही भयंकर विषाणू ओमक्रॉयन पसरल्याने त्या देशात निर्बंध लागू करण्यात आले आहे. भारतात केंद्र आणि राज्य सरकारने सुद्धा विदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नवीन निर्बंध लागू केले आहे. तसेच जिल्ह्यांनादेखील विदेशातून येणाऱ्या नजर ठेवून त्यांना वेळीच क्वारंटाइन करण्याच्या सूचना केल्या आहे. 

ओमायक्राॅन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी अलर्ट राहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. तसेच डबल सर्जिकल मास्कचा वापर करावा, वांरवार हात स्वच्छ धुवावे आणि कोरोना प्रतिबंधात्मक लस आवश्यक घ्यावी.- नयना गुंडे, जिल्हाधिकारी

 अशी घ्या काळजी...

- घराबाहेर पडताना दुहेरी मास्क वापरा - अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा - २० सेकंदांपर्यंत साबणाने हात स्वच्छ धुवा-  फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा -  दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवा - घर व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा- परिसराचे निर्जंतुकीकरण करा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या