शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

चिंताजनक! गोंदिया जिल्ह्यात मात करणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 06:00 IST

Gondia News Corona ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा एका गोंदिया जिल्ह्यात वाढल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे६ दिवसांतील आकडेवारीपुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा एका वाढल्याचे दिसून येत आहे. बाधित कमी व मात करणारे जास्त अशी स्थिती आता बदलली असून १३ ऑक्टोबरपासून पुन्हा मात करणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या नोदविली जात आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशात जिल्हावासीयांनी पुन्हा आता आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणणे गरजेचे झाले आहे.सप्टेंबर महिन्यातील आकडेवारीने सर्वांनाच दहशतीत आणल्यानंतर ऑक्टोबर महिन्याची सुरूवात दिलासा देणार ठरली. बाधितांची संख्या कमी व कोरोनावर मात करणाऱ्या कोरोना योद्धांची संख्या जास्त असे चित्र जिल्ह्यात दिसून येत होते. त्यामुळे झपाटयाने बाधितांची संख्या कमी झाली होती. परिणामी जिल्हावासी टेन्शनमधून बाहेर पडू लागले होते. १२ ऑक्टोबर पर्यंतची आकडेवारी जिल्हावासीयांना सुखावणारी दिसून येत होती. ही आकडेवारी बघता जिल्ह्यात कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले असे वाटत होते.

मात्र जिल्हावासीयांचा हा भ्रण जास्त काळ टिकला नाही व १३ ऑक्टोबरपासून पुन्हा चित्र पालटले व मात करणाऱ्यापेक्षा बाधितांची संख्या जास्त नोंदविली जाऊ लागली. ही वाढ सलग सुरूच असून १३ ते १८ ऑक्टोबर या ६ दिवसांत जिल्ह्यात ७१८ बाधित तर ३९७ मात करणारे असे आकडे आहेत.एकंदर कोरोना जिल्ह्यात पुन्हा पाय पसरू लागला आहे असे चित्र दिसून येत आहे. परिणामी जिल्हावासीयांनी शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांचा काटेकोरपणे अंमलात आणणे आताही गरजेचे आहे हे दिसून येत आहे.नवरात्रोत्सवात जास्त काळजीची गरजनवरात्रोत्सवामुळे सध्या नागरिकांचे घराबाहेर पडणे सुरू झाले असल्याचे दिसत आहे. नवरात्री बघता पाहिजे त्या प्रमाणात गर्दी दिसत नसली तरीही नागरिक देवी दर्शनासाठी म्हणून घराबाहेर पडत आहेत. अशात नागरिकांचा संपर्क वाढणार व हीच कोरोनाला आपला विळखा अधिक घट्ट करण्यासाठी अनुकूल स्थिती असते. यामुळे नागरिकांनी धोका कमी झाल्याच्या संभ्रमात न राहता आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणून आणखी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस