शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक कुटुंब दिवस; कौटुंबिक सलोखा जपणारा गोंदियातील बनोठे परिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 11:35 IST

घरातील संयुक्त कुटुंबांची जागा फ्लॅट संस्कृतीमुळे विभक्त कुटुंब पध्दतीने घेतली. पती,पत्नी आणि मुले ऐवढ्या पुरतेच मर्यादित झाले. मात्र सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला येथील बनोठे कुटुंब अजुनही संयुक्त कुटुंबांचा वारसा जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्दे१८ सदस्य एका छताखालीशेतीपुरक व्यवसायातुन अनेकांना देतात रोजगार

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मातीच्या घरांची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली. तर घरातील चुलीची जागा आधुनिक काळात गॅस सिलिंडरने घेतली आहे. मातीच्या भिंती पडत जावून सिमेंटचे जंगल तयार होत गेले आणि कुटुंबातील सदस्यांचे अंतर वाढू लागले. घरातील संयुक्त कुटुंबांची जागा फ्लॅट संस्कृतीमुळे विभक्त कुटुंब पध्दतीने घेतली. पती,पत्नी आणि मुले ऐवढ्या पुरतेच मर्यादित झाले. मात्र सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला येथील बनोठे कुटुंब अजुनही संयुक्त कुटुंबांचा वारसा जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.८५ वर्षीय कुटुंब प्रमुख झलकन सुमेशसिंह बनोठे यांनी आपल्या कुटुंबांना एका सुत्रात बांधून ठेवले आहे. शेती व शेतीपुरक व्यवसायातून आपल्या मुलांना व कुटुंबातील इतर सदस्यांना कर्तव्यावर सतत निर्विवाद कार्यरत ठेवण्याची संधी त्यांनी निर्माण केली. त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य पारिवारिक एकतेला प्रथम महत्त्व देत आपल्या वाट्याला आलेले कार्य आपले कर्तव्य म्हणून पार पाडतो. हीच बनोठे कुटुंबियांची मोठी ताकद म्हणावी लागेल. बनोठे कुटुंबात झलकन बनोठे कुटुंब प्रमुख असून आज ते ८५ वषार्चे झाले तरी त्यांच्या मार्गदर्शन व सल्लाशिवाय घरात कुठलेही निर्णय घेतले जात नाही. ते सुध्दा नेहमी आपल्या मुलाच्या सल्याची कधीही अवहेलना करीत नाही. त्यामुळे काम आणि निर्णय घेण्यात समन्वय साधण्यात नेहमी यश मिळते.झलकन बनोठे याची पत्नी तरासनबाई बनोठे ह्या ७८ वर्षाच्या असून त्यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम केले. या दोघांची तीन मुले असुन यात सर्वात मोठा नुतनलाल बनोठे ५३ वषार्चा त्याची पत्नी सुशीला बनोठे ५० वषार्ची, दुसरा मुलगा सेवकलाल बनोठे ५० वर्ष वयाचा त्याची पत्नी ४६ वर्ष वयाची, तिसरा मुलगा सेवकलाल बनोठे ४५ वर्षाच्या आणि त्याची पत्नी पुष्पाबाई बनोठे ४५ वर्ष वयाची असून तिघांनाही मुल बाळ आहेत. नुतनलाल बनोठे आणि सुशीला बनोठे याच्या एकुण सहा मुली असून तीन मुलीचे लग्न होऊन सासरी गेल्या आहेत. तर तीन मुलींमध्ये रेणुका बनोठे (२६), प्रगती बनोठे (२२) आणि पायल (१९) याचा समावेश आहे. दुसरा मुलगा सेवकलाल बनोठे हा शिक्षक आहेत. अध्यापन कार्य करण्याच्या व्यतीरिक्त नेहमी घरच्या शेतीवाडीकडे व इतर कामाकडे लक्ष देतात. सेवक बनोठे आणि त्याची पत्नी ओमकुवरबाई बनोठे याची दोन अपत्ये असुन मुलगी नंदिनी बनोठे (२३) आणि मुलगा दुष्यंत बनोठे (१९) शिक्षण घेत आहेत. तिसरा मुलगा येवकलाल बनोठे व त्याची पत्नी पुष्पा याची तीन मुले-मुली असुन मुलगा मुकेश (१९), मुलगी भारती बनोठे (१६) आणि छोटा मुलगा लक्की बनोठे (१४) यांचा समावेश आहे. येवक बनोठे वर्षभर शेतीच्या कामात लक्ष देत असुन खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी नेहमी प्रयत्न करतात. सध्या विभक्त कुटुंब पध्दतीत बनोटे यांचे संयुक्त कुटुंब आदर्श ठरत आहे.२५-३० लोकांना वर्षभर मिळतो रोजगारझलकन बनोठे याचे कुटुंब उन्नत शेतीकरिता परिसरात ओळखले जाते. शेतीपुरक व्यवसाय सुद्धा मोठ्या जिद्द व चिकाटीने करतात. शेती आणि शेतीपुरक व्यवसायाच्या माध्यमातुन गावातील आणि परिसरातील २५-३० महिला पुरूषांना नियमित रोजगार उपलब्ध करून देतात. यात दोन्ही हगांमात शेतीमध्ये जमिनीची मशागत शेतातील रोवणी व धानाच्या कापणीची कामे करतात.

टॅग्स :Familyपरिवार