शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

कृषी विभागामार्फत सेंद्रीय शेती विषयावर कार्यशाळा

By admin | Updated: June 12, 2016 01:35 IST

जिल्ह्यातील ‘एमएसीपी’ प्रकल्प अंतर्गत स्थापन झालेल्या प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीतील ५० सभासद शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतीकरिता

गोंदिया : जिल्ह्यातील ‘एमएसीपी’ प्रकल्प अंतर्गत स्थापन झालेल्या प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीतील ५० सभासद शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतीकरिता समूहाची निवड करण्यात आली आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती व प्रचार-प्रसाराकरिता जैन कुशल भवन पुराना बस स्टँड रोड, गोंदिया येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान परंपरागत कृषी विकास योजना २०१५-२०१६ सेंद्रीय शेती या योजनेंतर्गत जिल्हा कृषी अधीक्षक गोंदिया, प्रकल्प संचालक कृषी अधीक्षक गोंदिया तसेच प्रकल्प संचालक आत्मा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून सेंद्रीय शेती तज्ज्ञ हेमंत चव्हाण नागपूर, कृषि अधीक्षक तथा प्रकल्प संचालक आत्मा गोंदियाचे चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया नाईनवाड, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा गोरेगावचे पटले, सेंद्रीय भाजीपाला चिराग पाटील, भात शेती उत्पादक समूहाचे अध्यक्ष प्यारेलाल गौतम, सचिव टोपराम फुकटकर, सुरेंद्र मेंढे (एनयूएस) शेतकरी उत्पादक कंपनीचे कोषाध्यक्ष उपस्थित होते. कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक हेमंत चव्हाण यांनी सेंद्रीय शेती ही आजच्या काळाची गरज आहे. सेंद्रीय शेती करुन जमिनीचे आरोग्य टिकवून सर्वांनी विषमुक्त शेतमाल उत्पादन करायला पाहिजे, सेंद्रीय शेतमालाचे फायदे, सेंद्रीय शेतमालाला मोठा आंतरराष्ट्रीय बाजार उपलब्ध असल्याचे सांगितले. चव्हाण साहेब प्रकल्प संचालक आत्मा यांनी परंपरागत कृषी विकास योजना ही राष्ट्रीय शाश्वत अभियान अंतर्गत आहे. या योजनेमध्ये ४० टक्के राज्य शासनाचा व ६० टक्के केंद्र शासनाचा अनुदान असून शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानीत आहे. ही योजना ३ वर्ष कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.उपविभागीय कृषी अधिकारी नाईकवाड यांनी सेंद्रीय शेतीचे फायदे व या योजनेंतर्गत जे शेतकरी सेंद्रीय शेती करतील त्यांना ३ वर्षानंतर सेंद्रीय शेती शेतमाल उत्पादक म्हणून प्रमाणित करण्यात येईल, अशी माहिती दिली.गटसमन्वयक योगेंद्र बिसेन, चिराग पाटील संस्था तिल्ली (मोहगाव) यांनी आपण देशी गाईपासून घरगुती खत, जिवामृत, बिजामृत, घनामृत, दशपर्णी तयार करण्याची पद्धत व घरगुती खतांचा वापर करुन रासायनिक खत किटकनाशकाचा वापर टाळून चांगले उत्पादन घेऊ शकतो. या प्रकारचा उपक्रम आम्ही संस्थेमार्फत मागील ३ वर्षांपासून राबवित आहोत. ज्या शेतकऱ्यांनी या घरगुती खताचा वापर केला त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन कृषी पणन तज्ज्ञ आत्मा गोंदिया टेंभूर्णेकर व आभार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गोरेगाव पटले यांनी केले. (वार्ताहर)