शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:11 IST

पाच महिन्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस संयुक्तरीत्या निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या कामापुरते सिमीत न राहता परिस्थितीचे भान ठेवून आपल्या गाव व परिसरातील विकास कार्य ........

ठळक मुद्देप्रफुुल्ल पटेल : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : पाच महिन्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस संयुक्तरीत्या निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या कामापुरते सिमीत न राहता परिस्थितीचे भान ठेवून आपल्या गाव व परिसरातील विकास कार्य एकजुटीने करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.अर्जुनी-मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी व तालुका युवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी (दि.२३) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, नामदेव डोंगरवार, लोकपाल गहाणे, राकेश लंजे, यशवंत परशुरामकर, जनार्धन काळसर्पे, रतिराम राणे, यशवंत गणवीर, सुधीर साधवानी, नितीन धोटे, योगेश नाकाडे, सुशिला हलमारे उपस्थित होते.पुढे बोलताना पटेल यांनी, तालुक्यातील प्रत्येक गावागावात जावून बुथनिहाय मतदानाची आकडेवारी निश्चित करावी. तरुण मंडळींशी सुसंवाद साधून आत्मविश्वास निर्माण करुन त्यांची अडलेली कामे पूर्ण करावी. गावातील प्रत्येक माणूस राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडणे गरजेचे आहे. सामान्य लोकांची कामे विश्वासाने केली तर निश्चित बुथनिहाय आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील. यासाठी बुथ कार्यकर्त्यानी सजग राहून कार्य करावे असे सांगीतले.नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये लोकांना नुसते आश्वासन देवून भुरळ पाडली. आता ती परिस्थिती राहीली नाही. पंतप्रधान मोदीचे पितळ उघडे पडले आहे. महाराष्ट्रात ७२ हजार मेगा नोकरी भरती करण्याचे खोटे सांगीतले. चार लाख नोकऱ्यांची गरज असतांना सरकारी नोकºयांमध्ये बंदी घातली आहे. काळा पैसा परत आणून १५-१५ हजार प्रत्येक शेतकºयांच्या खात्यात जमा करणे, नक्षलग्रस्त या परिसरातील विकास निधीचे २५ हजार कोटी नाहीसे करणे, आजपर्यंत कोणत्याही शेतकºयांना पीक विम्याचा फायदा मिळाला नाही. यात भाजप सरकारने फार मोठा घोटाळा केला आहे. शेतकºयांचे २० हजार कोटी विमा कंपनीकडे प्रिमियम पोटी जमा होत असतांना शेतकºयांना नुकसान भरपाई म्हणून दोन हजार कोटी रुपये मंजूर करुन शेतकºयांचा तोंडाला पाने पुसीत असल्याचा आरोप करुन विमान खरेदीत ६०० कोटी ऐवजी १६०० कोटी देवून भ्रष्टाचार केल्याचेही ते म्हणाले.याप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे यांनी बुथनिहाय आढावा घेवून माहिती दिली. प्रास्ताविकातून अनिल लाडे यांनी खा. प्रफुल पटेल यांनी यापूर्वी केलेल्या विकास कामाची माहिती देऊन पुढील प्रस्तावित विकास कामे करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मेळाव्याला परिसरातील एक हजार महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन उद्धव मेहेंदळे यांनी केले. आभार तरोणे यांनी मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसprafull patelप्रफुल्ल पटेल