लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारच्या भूमिगत गटार योजनेतंर्गत गोंदिया शहरासाठी ही योजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने १७५ कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन दिला आहे. मात्र या योजनेचे काम अद्यापही सुरू करण्यात नव्हते. या विषयाकडे आपण स्वत: लक्ष घातले असून लवकरच ही योजना ट्रॅकवर येवून काम सुरू असल्याचे खा.प्रफुल्ल पटेल यांनी आज (दि.६) त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेला आ.मनोहर चंद्रिकापूर,माजी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते. खा.पटेल म्हणाले गोंदिया शहराला स्वच्छ सुंदर करण्यासाठी भूमिगत गटार योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना लवकर मार्गी लागावी यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. शहरातील ११० कोटी रुपयांच्या भूमिगत विद्युत लाईनचे काम सुध्दा लवकर सुरू करण्यात येईल. यासाठी मुंबई येथे लवकरच बैठक घेवून हा विषय सुध्दा मार्गी लावण्यात येईल असे सांगितले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी आणि प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. येत्या दोन वर्षांत महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण करुन हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल होणार असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोंदिया-जबलपूर रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे. या रेल्वे लाईनवरुन रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार होत्या.मात्र कोरोनामुळे यात खंड निर्माण झाला आहे. रेल्वे गाड्या सुरू करण्यासंदर्भात रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यासह चर्चा झाली असून त्यांनी सुध्दा याला ग्रीन सिग्नल दिला आहे. २०२० अखेर या मार्गावर रेल्वे गाड्या धावतील असे खा.पटेल यांनी यावेळी सांगितले.खरीप आणि रब्बीमध्ये विक्रमी धान खरेदीमहाविकास आघाडी सरकारने धानाला प्रती क्विंटल १८३५ हमीभाव आणि दोनशे रुपये प्रोत्साहान अनुदान व पाचशे रुपये बोनस दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना धानाचा प्रती क्विंटल दर २५१५ रुपये मिळाला. एवढा दर प्रथमच मिळाल्याने खरीप आणि रब्बी हंगामात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विक्रमी धान खरेदी झाली. धानाचे चुकारे व बोनसचे आतापर्यंत १३०० कोटी रुपये अदा करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच खºया अर्थाने शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
भूमिगत गटार योजनेचे काम लवकरच ट्रॅकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST
पत्रकार परिषदेला आ.मनोहर चंद्रिकापूर,माजी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते. खा.पटेल म्हणाले गोंदिया शहराला स्वच्छ सुंदर करण्यासाठी भूमिगत गटार योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना लवकर मार्गी लागावी यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. शहरातील ११० कोटी रुपयांच्या भूमिगत विद्युत लाईनचे काम सुध्दा लवकर सुरू करण्यात येईल.
भूमिगत गटार योजनेचे काम लवकरच ट्रॅकवर
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : गोंदिया-जबलपूर रेल्वे लाईन लवकरच सुरू होणार