शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याचे जीवन फुलविणारे महादानाचे कार्य घडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:39 IST

दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. लोकमततर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा एक स्तुत्य उपक्रम असून प्रत्येकाच्या हातून या महादानचे कार्य घडावे, असे उद्गार डॉ. नितीन दवंडे यांनी काढले.

ठळक मुद्देनितीन दवंडे : जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. लोकमततर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा एक स्तुत्य उपक्रम असून प्रत्येकाच्या हातून या महादानचे कार्य घडावे, असे उद्गार डॉ. नितीन दवंडे यांनी काढले.लोकमत वृत्तपत्रसमूह व डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी शहरातील सुभाष बागेतील हुतात्मा स्मारक येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने विनायक नखाते, रत्नमाला चौधरी, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, डॉ. सुवर्णा हुबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने झाली.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. नितीन दवंडे म्हणाले, लोकमत सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबवित असते. सखी मंच, बाल विकास मंच व युवा नेक्स्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविते. यामाध्यमातून समाजमन घडविण्याचे कार्य लोकमत करीत आहे. लोकमतचा ठसा वाचक वर्गावर असून विविध उपक्रमांतून समाजमन घडविण्याची लोकमतची तळमळ समाजात दिसून येते. या प्रसंशनिय कार्याबद्दल लोकमतची स्तुती केली.या वेळी रक्तगट, हिमोग्लोबीन, रक्तदाब तपासणी करून रक्तदानास सक्षम असलेल्या अनेकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. संचालन व आभार श्रीकांत पिल्लेवार यांनी केले. या वेळी जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, सखी मंच संयोजिका ज्योत्सना सहारे, नरेश रहिले, अतुल कडू, प्रफुल बावणे, सचिन कावळे, प्रफुल गणविर, हितेश बंसोड, मनिष मेश्राम, असलम खान, मदन मारबते, सुमित देशपांडे, शिवांशु मिश्रा, हर्षा भोंगडे, पूजा टेंभरे, रेखा कुर्वे, ललीता ताराम, प्रिया बोहरे, मीना डुंबरे, आम्रपाली वनकर, दीपा काशिवार, प्रमोद बागडे यांनी सहकार्य केले.