शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

महिलांनी फुंकले कबड्डीचे रणशिंग

By admin | Updated: March 13, 2016 02:03 IST

आधुनिक विचारांनी आदिवासी महिलांचे जीवन बदलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु अजुनही या बदलाचे वारे गतीशिल झालेले नाही.

कंत्राटदाराने दाखविली असमर्थता विजय मानकर सालेकसासालेकसा तालुक्यातील दोन भागांना जोडणारा तिरखेडीनजीकच्या वाघ नदीवरील पुलाचे बांधकाम वांद्यात आले आहे. मागील एका वर्षापासून ‘जैसे थे’ परिस्थितीत हे काम पडून आहे. त्यामुळे सातगाव (साकरीटोला) परिसरात वास्तव्यात असलेल्या नागरिकांचा अपेक्षाभंग होताना दिसत आहे. एकीकडे पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत शासनाचा निधी थकीत आहे तर दुसरीकडे कंत्राटदाराने आपली क्षमता असेपर्यंत स्वत:चा निधी खर्च केला आणि शासनाचा निधी मिळाला नाही तर पुलाचे निर्माण कार्य मधातच थांबवून ठेवले. निधी प्राप्त झाला नाही म्हणून आता कंत्राटदाराने यापुढे पुलाचे काम करणार नाही असे सांगत आपला कंत्राट रद्द करावा यासाठी सरकारला नोटीस सुद्धा बजावली आहे. जोपर्यंत कंत्राटदारासोबत शासनाचे निधीसंबंधी प्रश्न निकाली लागणार नाही, तोपर्यंत पुढे पुलाचे काम होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्यातरी पुलाचे बांधकाम वांद्यात आले आहे. येत्या अडीच तीन महिन्यात पावसाळा लागणार. अशात यंदातरी हा पूल बनेल याची शक्यता दूर दिसत नाही.शिरपूर वाघ जलाशयातून निघणारी वाघनदी पुजारीटोला धरणाला जोडून सालेकसा तालुक्यातून वाहत जाते. या वाघ नदीमुळे तालुक्याचा एक तृतीयांश भाग इतर भागासोबत विभागला गेला आहे. पावसाळ्यात चार महिने नदी वाहत असल्याने तालुका मुख्यालयाशी रस्त्याच्या संपर्काबाहेर असतो. तेव्हा सातगाव (साकरीटोला) परिसरातील लोकांना सालेकसा तालुका मुख्यालय गाठण्यासाठी आधी आमगावला जावे लागते. नंतर आमगाववरुन मुख्य मार्गाने सालेकसा मुख्यालयाकडे जावे लागते. छोट्या छोट्या कामासाठी पूर्ण दिवस वाया घालवावा लागतो. या सर्व बाबीकडे लक्ष देत शासनाने तिरखेडीनजीक नवीन पुलाच्या निर्मितीसाठी मंजुरी दिली. पुलासह सर्व प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून सातगाव परिसरातील लोक स्वतंत्र तालुक्याची मागणी करीत आहेत. परंतु लोकसंख्या कमी पडत असल्याने स्वतंत्र तालुका निर्मितीत सुद्धा अडचण निर्माण होत आहे. या सर्व बाबी बाजूला ठेवून वाघनदीवरील उंच पुलाची निर्मिती झाली तर सर्व गावे वर्षभर तालुका मुख्यालयाशी जुळलेली राहतील. सालेकसा हा सरळ देवरी व महामार्गाला जोडला जाईल याचा बरोबर साकरीटोला सरळ चारही बाजूनी सालेकसासह देवरी, आमगाव आणि आसोलीमार्गे गोंदियाशी जुळून राहील. पुलाअभावी गावे तळ्यात-मळ्यात तिरखेडीनजीक वाघ नदीवरील उंच पुलाची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. परंतु तालुक्याच्या निर्मितीला आज ३४ वर्षे लोटूनही येथे उंच पूल बनला नाही. १९९२-९३ मध्ये येथे एका बुडीत पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु पावसाळ्यात तो कोणत्याही कामाचा नाही राहीला. दरम्यान सातगाव साकरीटोला परिसरातील अनेक गावे सालेकसा, आमगाव आणि देवरी तालुक्यात तळ्यात-मळ्यात होत राहीली. १९८२ मध्ये सालेकसा तालुक्याची निर्मिती झाली तेव्हा सातगावचा मोठा परिसरात अनेक गावांसह सालेकसा तालुक्यात ठेवण्यात आला. परंतु लांब अंतर आणि नदी ओलांडून जाण्याची अडचण लक्षात घेता या परिसरातील मोठा भाग आमगाव तालुक्याला जोडण्यात आला तर काही भाग देवरी तालुक्यात टाकण्यात आला. काही वर्षानी साकरीटोला परिसराला पुन्हा सालेकसा तालुक्यात परत टाकण्यात आले. त्यातील काही गावे आमगावातच कायम ठेवण्यात आली तर काही सालेकसा कडील गावे पुन्हा देवरीकडे टाकण्यात आली. अशा प्रकारे काही गावांना सतत तळ्यात-मळ्यात करण्यात आले. आजही काही गावे सालेकसा तालुक्यात असताना त्यांचा महसुली रेकार्ड आमगावातच आहे.