शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानाविरोधात महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:16 IST

वर्षभरापासून बंद असलेले दारु दुकान पुन्हा सुरू केले जात असल्याची माहिती खमारी येथील महिलांना कळताच त्यांनी शनिवारी (दि.७) दुपारी २ वाजताच्या सुमारास या विरोधात एल्गार पुकारला.

ठळक मुद्देदारूच्या बाटल्या फोडल्या : वर्षभरापासून बंद असलेले दुकान सुरू करण्याचा प्रयत्न, खमारीत तणावाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वर्षभरापासून बंद असलेले दारु दुकान पुन्हा सुरू केले जात असल्याची माहिती खमारी येथील महिलांना कळताच त्यांनी शनिवारी (दि.७) दुपारी २ वाजताच्या सुमारास या विरोधात एल्गार पुकारला. तसेच दारुच्या पेट्या रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. गावातील महिला आक्रमक झाल्याने खमारी येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.प्राप्त माहितीनुसार गोंदिया तालुक्यातील खमारी येथील बस स्थानकाजवळ एक देशी दारू दुकान आहे. हे दारू दुकान बंद करण्यासाठी २५ एप्रिल २०१७ ला खमारी येथील ग्रामसभेने ठराव पारीत करून हे देशी दारू दुकान बंद करण्यात आले. हा ठराव घेतला त्यावेळी सरपंचपदी विमला मोहन तावाडे या होत्या. सर्व गावकरी महिलांनी या दारू दुकानाला विरोध दर्शविला होता. हे दारू दुकान वर्षभरापासून बंद होते. विमला तावाडे सरपंच असल्यामुळे त्यांनी या दारू दुकानाला सुरूच होऊ दिले नाही. त्यानंतर दारू दुकान मालकाने शनिवारी एका वाहनात दारूच्या पेट्या आणल्या.येथील दारु दुकान पुन्हा सुरू केले जात असल्याची माहिती गावातील महिलांना कळताच २०० पेक्षा अधिक संख्येत महिलांनी एकत्र येवून या दारू दुकानाकडे धाव घेतली. आणलेली दारू परत ने असे दुकानदाराला महिलांनी सांगितले. परंतु महिलांचे दुकानदाराने न ऐकल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी दारूच्या बॉटल फोडल्या. एक बॉटल दुसऱ्या बॉटलवर आदळल्याने दारूने पेट घेतला. मात्र पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या सर्व प्रकारामुळे खमारी येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.विशेष म्हणजे या देशी दारू दुकानाला विरोध करणाºया सरपंच विमला मोहन तावाडे यांच्यावर २७ मार्च २०१८ ला अविश्वास आणण्यात आला.त्यांच्यावर अविश्वास आल्यानंतर आता लगेच दारू दुकान सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याने गावात विविध चर्चेला पेव फुटले आहे. काहीही झाले तरी गावात दारुचे दुकान सुरू होवू देणार नाही असा पावित्रा खमारी येथील महिलांनी घेतला आहे.गावातील तरूण व्यसनाधिनतेकडे वळू नये, यासाठी ग्रामसभेने हे दारू दुकान बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला. लोकांच्या भावनांचा आदर करीत मी सरपंचपदी असताना या दारू दुकानाला सुरूच होऊ दिले नाही. त्यामुळेच माझ्यावर अविश्वास आणण्यात आला. परंतु मी पदासाठी काम करीत नाही जनसामान्यांच्या हितासाठी माझे काम आहे. मी गावातील महिलांसोबत आहे.- विमला तावाडे,माजी सरपंच खमारी.