लोकमत न्यूज नेटवर्कचिचगड : आज प्रत्येक क्षेत्रात महिला समोर येत आहेत. ग्रामीण भागातील महिलांनी लघू उद्योगाच्या माध्यमातून आपली प्रगती साधवी. शासनाच्या विविध योजना या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे लघू उद्योग ग्रामीण भागात करता येतात. राजकारणातही महिला पुढाकार घेत आहेत. ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर राष्ट्रपतीपदापर्यंत महिलांनी बाजी मारली आहे. २१ व्या शतकात महिलांनी चुल व मूल या पुरते मर्यादित न राहता महिलांनी घराबाहेर पडून समाजाचे प्रतिनिधीत्व करावे असे प्रतिपादन माजी जि.प.सभापती सविता पुराम यांनी केले. चिचगड येथे मंगळवारी तालुका भाजपा महिला आघाडीतर्फे मकर संक्रांतीनिमित्त आयोजित महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष नूतन कोवे, पं.स.च्या माजी सभापती देवकी मरई, निता कुंजाम, मिना हमीद, शितल गिºहेपुंजे, विमल बिसेन, संध्या गाढवे उपस्थित होत्या. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नुतन कोवे यांनी मांडले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन गिता गजभिये यांनी केले तर आभार चिचगडच्या सरपंच कल्पना गोसावी यांनी मानले.
महिलांनी घराबाहेर पडून समाजाचे प्रतिनिधित्व करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:52 IST
आज प्रत्येक क्षेत्रात महिला समोर येत आहेत. ग्रामीण भागातील महिलांनी लघू उद्योगाच्या माध्यमातून आपली प्रगती साधवी. शासनाच्या विविध योजना या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महिलांनी घराबाहेर पडून समाजाचे प्रतिनिधित्व करावे
ठळक मुद्देसविता पुराम : चिचगड येथे महिला मेळावा व हळदी कुंकू