सविता पुराम : कुणबीटोल्यात महिलांच्या स्पर्धा सालेकसा : महिलांना मुक्तपणे काम करण्याची संधी मिळाली तर ती प्रत्येक वेळा संधीचे सोने करुन दाखवू शकते, एवढी क्षमता महिलेच्या रगारगात भरलेली असते. म्हणून महिलांना पुरुषांनी वेळोवेळी संधी देवून तिला प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यास मदत करावी, असे आवाहन गोंदिया जि.प.च्या माजी महिला व बालकल्याण सभापती सविता संजय पुराम यांनी केले. त्या कुणबीटोला (कावराबांध) येथे आयोजित तीन दिवसीय महिलांच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला बचत गटाच्या महिलांसाठी हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा कुणबीटोला येथील सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन कावराबांध येथील सरपंच मंजुताई बनोटे यांनी केले. अध्यक्षस्थानी कावराबांध क्षेत्राच्या पं.स. सदस्य प्रमिला दसरीया तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी जि.प. महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, झालीया क्षेत्राच्या पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, माजी सरपंच पुष्पा दसरीया, पोलीस पाटील पोषण बनोठे, बद्रीप्रसाद दसरीया, उपसरपंच दिनेश सुलाखे, बचत गट व्यवस्थापक शालू साखरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन हेमलता वैद्य यांनी केले. आभार शालू साखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया मोटघरे, झनक तुरकर, आशा येळे, रामकुवर नागपुरे, संतकला वैद्य, हेमलता वैद्य, सुधा मच्छिरके, कांता नागपुरे, शीला मेश्राम यांच्यासह शाळेचे शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सर्व क्रीडा स्पर्धांना यशस्वी व सुरक्षितरित्या पार पाडण्यात मदत करण्यासाठी मुख्याध्यापक बी.जी. बुलाखे, से.नि. मुख्याध्यापक फतेलाल रत्नाकर, दालचंद मोहारे, नुतन नागपुरे, गिरीधारी बनोटे, गंगाबाई वैद्य यांची उपस्थिती महत्वाची ठरली. (तालुका प्रतिनिधी) (तालुका प्रतिनिधी)
संधीचे सोने करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे
By admin | Updated: January 14, 2017 01:01 IST