शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जीर्णावस्थेतील घर कोसळून एक महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

येथील प्रभाग क्रमांक-६ मधील रहिवासी वच्छला गोपीचंद  कुंभरे (वय ६५) या दोन मुले, सून, दोन नात अशा सहाजणांसह आपल्या झोपडीवजा तुटक्या-फुटक्या घरात राहतात. घरातील सर्व गाढ झोपेत असताना शनिवारी रात्री १.३० वाजतादरम्यान  त्यांचे घरच कोसळले. घराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांनी एकच आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले व  त्यांनी  ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांना  सुखरूप बाहेर काढले.

ठळक मुद्देमध्यरात्रीची घटना : कुंभरे कुटुंबीयांना तीन वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : झोपडीवजा जीर्ण झालेले घर कोसळून त्याखाली दबून महिला जखमी झाली. येथे शनिवारी (दि. २०) मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, मागील तीन वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुंभरे कुटुंबीयांना घरकुल न मिळाल्याने ही योजना कितपत यशस्वी ठरत आहे हे यातून दिसून आले. 

येथील प्रभाग क्रमांक-६ मधील रहिवासी वच्छला गोपीचंद  कुंभरे (वय ६५) या दोन मुले, सून, दोन नात अशा सहाजणांसह आपल्या झोपडीवजा तुटक्या-फुटक्या घरात राहतात. घरातील सर्व गाढ झोपेत असताना शनिवारी रात्री १.३० वाजतादरम्यान  त्यांचे घरच कोसळले. घराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांनी एकच आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले व  त्यांनी  ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांना  सुखरूप बाहेर काढले. यात वच्‍छलाबाईंची सून उर्मिला हिच्या डोळ्याला, हाताला व पायाला इजा झाली आहे.  त्यांना रात्रीच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कुंभरे कुटुंबीय मागील तीन वर्षांपासून घरकुलच्या प्रतीक्षेत असून, यामुळेच ते तुटक्या-फुटक्या झोपडीवजा घरात वास्तव्य करीत आहेत. असे कितीतरी कुटुंबीय आजही अशाच घरांमध्ये आहेत. अधूनमधून अवकाळी पावसाचा धोका आहेच. आम्ही अडाणी असल्यामुळे कागदपत्रांचा पाठपुरावा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला तीन वर्षांपासून अजूनही घरकुल मिळाले नाही, अशी खंत वच्‍छलाबाई यांनी व्यक्त केली आहे. तर प्रभाग क्रमांक-६ मधील नागरिकांनी अत्यंत गरजू लोकांना घरकुल मिळण्यास विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने १०० अत्यंत गरज असलेल्या लोकांची यादी पाठविली आहे. पूर्वी संगणीकृत झालेल्या (अ) यादीतील लाभार्थ्यांना घरकुल मिळणार. त्यानंतर ब, क, ड यादीतील गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळतील अशी प्रशासकीय व्यवस्था आहे. अत्यंत गरजूंना ताबडतोब घरकुल देता येत नाही असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येते. कुंभरे कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत तातडीने करेल असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी सांगितले आहे. 

देव तारी त्याला कोण मारी ...कुंभरे यांचे घर पडल्याने त्याखाली घरातील सर्वच सदस्य दबले गेले होते. यात उर्मिला यांना मारही लागला आहे. मात्र, या ढिगाऱ्यात दबलेली साडेतीन महिन्यांची पूर्वी व अडीच वर्षांची तृप्ती या वच्‍छलाबाईंच्या दोन्ही नातींना काहीच झाले नाही व त्या सुखरूप बाहेर निघाल्या. नशीब बलवत्तर म्हणूनच या दुर्घटनेतून त्या सुखरूप बचावल्या असून, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना