शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महिलाशक्तीपुढे उभी बाटली झाली आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:22 IST

तालुक्यातील तुमखेडा येथील महिलांनी गावात दारूबंदी करण्यासाठी एल्गार पुकारला होता. यासाठी शनिवारी (दि.२५) मतदान घेण्यात आले. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.

ठळक मुद्देतुमखेडा येथे दारूबंदीसाठी मतदान : गावातून दारू होणार हद्दपार, महिनाभरापासून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील तुमखेडा येथील महिलांनी गावात दारूबंदी करण्यासाठी एल्गार पुकारला होता. यासाठी शनिवारी (दि.२५) मतदान घेण्यात आले. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. यात गावातील ६४० मतदारांनी दारूबंदीच्या बाजुने मतदान केल्याने महिलाशक्तीपुढे उभी बाटली आडवी झाली. त्यामुळे गावात दारुबंदीचा मार्ग मोकळा झाला. मतमोजणीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर महिलांनी एकच जल्लोष केला. मागील महिनाभरापासून उभारलेल्या लढ्याला यश आल्याचा आंनद व्यक्त केला.तुमखेडा येथील महिलांनी गावात दारुबंदी करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यासाठी शनिवारी (दि.२५) मतदान घेण्यात आले. गावातील एकूण १०५२ मतदारांपैकी ७४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात मतमोजणीनंतर दारुबंदीसाठी एकूण ६३६ मतदारांनी मतदान केले. तर दारुबंदीच्या विरोधात ५४ जणांनी मतदान केले. तर ५० मते अवैध ठरली. एकूृण झालेल्या मतदानात सर्वाधिक ६३६ मतदान दारुबंदीच्या बाजुने झाले. त्यामुळे दारुबंदीसाठी आवश्यक मतदानापेक्षा अधिक मतदान झाल्याने तुमखेडा येथे दारूबंदी करण्याचा ठराव पारित झाला. दारुबंदीसाठी आडवी बाटली आणि दारुबंदीच्या विरोधात उभी बाटल अशा मतपत्रिका ठेवण्यात आल्या होत्या. अखेर गावातील महिला शक्ती आणि मागील महिनाभरापासून महिलांनी यासाठी उभारलेल्या लढ्याला यश आले. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदा अरविंद हिंगे व नायब तहसीलदार एन.एम.बेदी व राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आर.एन.सिंगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक घेण्यात आली. सायंकाळी ७.४५ वाजता तहसीलदार हिंगे यांनी मतमोजणीचा निकाल जाहीर केला. दारुबंदीच्या बाजुने सर्वाधिक ६३६ मतदान झाल्याचे जाहीर केले. तसेच तुमखेडा येथे दारुबंदी करण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान निकाल जाहीर होताच महिलांनी एकच जल्लोष केला. गावातील अनेक कर्ते पुरूष दारुच्या आहारी गेल्याने अनेकांचे कुटुंब उध्दवस्त झाले. तर काहींचे होण्याच्या मार्गावर होते. दरम्यान गावातील महिलांनी एकत्र होत या विरुध्द एल्गार पुकारल्याने बऱ्याच महिलांना दिलासा मिळाला.हा महिलाशक्तीचा विजयगावातील अनेक पुरूष दारुच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक कुटूंबाची वाताहत झाली. अनेक महिलांवर यामुळे संकट ओढवले. दरम्यान तुमखेडा येथील महिलांनी एकत्र येत या विरुध्द एल्गार पुकारला. अखेर गावात दारुबंदीचा करण्याचा मार्ग मतदानानंतर मोकळा झाला आहे. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने तुमखेडा येथील महिला शक्तीचा विजय आहे.- अ‍ॅड. सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्त्या.जनजागृतीचे फलिततुमखेडा खुर्द येथे दारुबंदी करण्यासाठी गावातील महिलांनी महिनाभरापासून कंबर कसली होती. गावात रॅली काढून, दवंडी देऊन दारुबंदीसाठी जनजागृती केली. दारुबंदीचे महत्त्व महिलांना पटवून दिले. या जनजागृतीचे फलित शनिवारी झाले.

टॅग्स :liquor banदारूबंदी