शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने 'असा' काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 15:53 IST

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकरासोबत मिळून खून केला. या दोघांनी कुऱ्हाडीने डोक्यावर मारून मुन्ना पारधीला ठार केले.

ठळक मुद्देआरोपींची कबुली : २४ तासात खुनाचा गुन्हा उघड

गोंदिया : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बघोली येथील मुनेश्वर ऊर्फ मुन्ना शेषराम पारधी (३५) यांचा २० नोव्हेंबरच्या रात्री कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. पतीच्या खुनाचा कट पत्नीनेच रचला होता. आपल्या प्रियकरासोबत कट रचून नवऱ्याला यमसदनी पाठविणाऱ्या पत्नीला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी २४ तासात अटक केली.

२० नोव्हेंबरच्या रात्री मुनेश्वर ऊर्फ मुन्ना शेषराम पारधी (३५, रा. बघोली, ता. तिरोडा) हा आपल्या घरी पत्नी व मुलांसह झोपला होता. मृतकाची पत्नी शारदा मुनेश्वर पारधी (३०) हिने तिचे नातेवाईक व फिर्यादी प्रदीप बाबुलाल बघेले यांना २१ नोव्हेंबरच्या पहाटे ३.३० वाजता फोन करून घरी बोलावले. ते त्याच्या आईसह मुनेश्वरच्या घरी गेले.

यावेळी मुनेश्वरच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या जखमा आढळून आल्या. तो बेशुध्द स्थितीत मिळून आल्यामुळे प्रदीप बघेले यांनी डॉक्टरांना बोलावून त्याची तपासणी केली असता तो मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणात दवनीवाडा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांनी आरोपीचा शोध घेऊन तत्काळ गुन्हा उघड करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार दवनिवाडा पोलीस ठाण्याचा एक चमू व स्थानिक गुन्हे शाखेचा दुसरा चमू असे दोन चमू गठित करण्यात आले.

मुन्नाच्या पत्नीने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुणाल मनोहर पटले (२२, रा. बघोली) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या दिशेने तपास यंत्रणेने तपास केला असता मृतकची पत्नी शारदा मुनेश्वर पारधी व कुणाल मनोहर पटले यांचे अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. त्यांच्या अनैतिक संबंधाबाबत मृतकास माहिती झाली होती. त्यामुळे आरोपीने मनात राग बाळगून तसेच मृतकाच्या पत्नीसोबत संगनमत करून मुनेश्वर ऊर्फ मुन्ना शेषराम पारधी याला ठार करण्याचा चंग बांधला.

२१ नोव्हेंबरच्या पहाटे ३.३० वाजता शारदा मुनेश्वर पारधी व कुणाल मनोहर पटले या दोघांनी कुऱ्हाडीने डोक्यावर मारून मुन्नाला ठार केले. त्या दोन्ही आराेपींना २१ नोव्हेंबर रोजी रात्री ११.२४ वाजता अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भोसले करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी