शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

चार दिवसांतच विरले स्वच्छता अभियान

By admin | Updated: October 8, 2014 23:27 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना देशवासीयांपुढे मांडली. या संकल्पनेला देश पातळीवरून चांगला

कार्यालयात पुन्हा कचरा : कर्मचारी आपल्या कामात व्यस्तगोंदिया: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना देशवासीयांपुढे मांडली. या संकल्पनेला देश पातळीवरून चांगला प्रतिसादही मिळाला. येथील शासकीय कार्यालयांनीही हिरीरीने यात भाग घेत कार्यालयांत अभियान राबवून टाकले. मात्र अनेक कार्यालयात हे स्वच्छता अभियान केवळ त्या दिवसापुरतेच मर्यादित राहिले. पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.स्वच्छ भारत अभियानाची ही संकल्पना कायमस्वरूपी रहावी हे अपेक्षित होते. त्यासाठीच सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली. मात्र येथील शासकीय कार्यालयांत फेरफटका मारल्यावर चार दिवसांतच स्वच्छता अभियान हवेत विरल्याचे बघावयास मिळाले. कार्यालय परिसरात कचरा दिसू लागला असून हे अभियानही अन्य अभियानांप्रमाणेच फक्त ‘चार दिन की चांदनी’ ठरल्याचे दिसले. स्वच्छतेबाबत कुणाला समजावून सांगण्यापेक्षा स्वत: पासून त्याल सुरूवात करावी या उद्देशातून पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारताचे स्वप्नसाकारण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. त्यांच्या या अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरासह परिसर व कार्यस्थळालाही स्वच्छ ठेवावे व त्यासाठी दिवसातले काही तास स्वच्छतेवर घालवावे अशी ही संकल्पना होती. सर्वांनीच त्यांच्या या संकल्पनेला दाद दिली व यात शाळा तसेच शासकीय कार्यालयांनीही हिरीरीने भाग घेतला. स्वच्छतेसाठी वरिष्ठ अधिकारीही हातात झाडू घेऊन सफाईसाठी सरसावल्याचे बघावयास मिळाले. मात्र अभियानाचे चार दिवस लोटल्यानंतर कार्यालयांत डोकावून बघितल्यावर तिच स्थिती बघावयास मिळाली. कार्यालय परिसरात कचरा व घाणीचे ढिगार आढळून आले. तर काही कार्यालयांत प्लास्टीकचे कप व रिकाम्या बाटल्याही दिसून आल्या. यातून सफाई न झाल्याची साक्ष मिळाली. एकंदर चार दिवसांतच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानाला बगल दिल्याचे दिसले. गोंदिया शहराची तशी खासीयत आहेच. येथे एखाद्य नवीन वस्तूला डोक्यावर धरले जाते व काही दिवसांनी त्याकडे ढुंकून पाहणारे कुणी दिसत नाही. तसलाच काहीसा प्रकार स्वच्छता अभियानाच्या बाबतीत घडला आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेही निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. अशात त्यांनीही आणखी डोकेदुखी कशाला म्हणूनच एका दिवसातच समाधान मानून घेतल्याचे बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)