गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर डोंगरवार यांच्या नेतृत्वात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या संदर्भात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून समस्यांचे निराकरण करून केलेल्या कार्याचा अहवाल मागितला आहे. शिक्षक समितीने वेतन नियमीत करणे, अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करणे, जिल्हा परिषद शाळांना ४ टक्के सादील रक्कम देणे, अंशदायी पेंशन योजनेची कपात करणे, गोरेगाव तालुक्यातील १९१ शिक्षकांची थांबविली वेतनवाढ पुर्ववतसुरू करणे, इतर मागण्यांसंदर्भात जि.प. शिक्षण विभाग गोंदियाने ३१ जानेवारी २०१५ नुसार अनुपालन सादर केले. समस्या निकाली काढण्याकरीता सहवाल सादर करणे, ४ टक्के सादील खर्च जि.प.ने अखर्चीत रक्कम १९ कोटी खर्च न केल्यामुळे शिक्षण संचालयाने अडविले. १९१ शिक्षकांची रजा प्रवास भत्ता थकबाकी भरलेली आहे. अतिरिक्त घरभाडे भत्ता ची फाईल वित्त विभागात असणे, एकस्तर पदवीधर पदोन्नती व इतर बील संदर्भात चर्चा करण्यात आली. या संदर्भात त्यांनी दुरध्वनीवरून मुकाअ यांच्याशी चर्चा केल्यावर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात आले. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी शिक्षक समिती गोंदियाचे शिष्टमंडळ आणखी मंत्रालय मुंबई येथे जाणार आहेत. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्याध्यक्ष बोरसे पाटील यांच्या नेतृत्वात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशीही चर्चा करण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, शेषराव येडेकर, किशोर डोंगरवार, सुरेश रहांगडाले, संदीप तिडके, एन.बी. बिसेन, पी.आर. पारधी, टी.आर. लिल्हारे, ओ.जे. वासनिक, दिलीप लोधी, सतीश दमाहे,एन.आर. मच्छीरके, वाय. बी. चव्हाण, बेनिराम भानारकर, टेलन बन्सोड, डी.आर. जीभकाटे, पी.एन. बडोले यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
वेतनवाढ पूर्ववत होणार
By admin | Updated: March 30, 2015 01:15 IST