पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामुळे सामान्य जनतेला दैनंदिन जीवन जगताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही दरवाढ कमी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली आहे. तहसीलदार भोयर यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
याप्रसंगी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तिरथ येटरे, तालुका सचिव संतोष श्रीखंडे, युवक शहर अध्यक्ष आनंद शर्मा, धनलाल मेंढे, सचिन ढेंगे, युवक सचिव कमलेश बहेकार, विद्यार्थी उपाध्यक्ष आकाश बिसेन, उमेश भोंडेकर, गोकुळ कोरे, सुमित कन्नमवार, अनिल किरमोरे, आदित्य मेश्राम, शुभम डोये, स्वप्निल कावडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.