शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या आगमनाने जिल्हा ‘ठंडा ठंडा कूल कूल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2022 20:38 IST

हवामान खात्याने यंदा लवकर पाऊस येणार असा अंदाज वर्तविला होता. मात्र, निसर्गाने त्यांचा अंदाज फोल ठरविला व ७ जूनपासून मृग लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नव्हती. परिणामी, उन्हाळा काही संपला नव्हता व रखरखत्या उन्हामुळे जिल्हावासी त्रासून गेले होते, तर दुसरीकडे बळीराजाची चिंता वाढत होती व पावसाअभावी शेतीची कामे ठप्प पडून होती. अशात सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागून होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जून महिना अर्धा लोटूनही जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली नसल्याने चिंतेत असलेल्या सर्वांनाच शनिवारी (दि.१८) रात्री पावसाने हजेरी लावून सुखद धक्का दिला. जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्याने एकीकडे जिल्ह्याचे तापमान घसरले असून, जिल्हा ‘ठंडा ठंडा -कूल कूल’ झाला असतानाच दुसरीकडे शेतकरी कामाला लागला असून, शेतीच्या कामांनी जोर धरला आहे. हवामान खात्याने यंदा लवकर पाऊस येणार असा अंदाज वर्तविला होता. मात्र, निसर्गाने त्यांचा अंदाज फोल ठरविला व ७ जूनपासून मृग लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नव्हती. परिणामी, उन्हाळा काही संपला नव्हता व रखरखत्या उन्हामुळे जिल्हावासी त्रासून गेले होते, तर दुसरीकडे बळीराजाची चिंता वाढत होती व पावसाअभावी शेतीची कामे ठप्प पडून होती. अशात सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागून होत्या. मात्र, उशिरा का होईना पावसाने जिल्ह्यात शनिवारी (दि.१८) रात्री हजेरी लावली व त्यामुळे तापमानात घट झाली असून, उकाड्यापासून सुटका मिळाली असतानाच शेतकरीसुद्धा सुखावला असून, तो कंबर कसून काळ्या मातीत उतरला आहे. 

जिल्ह्यात ४६.९ मिमी पावसाची नोंद - जिल्ह्यात शनिवारी खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सुरुवात झाली असून, जून महिन्यातील १९ तारखेपर्यंत ४६.९ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस ७६.४ मिमी देवरी तालुक्यात नोंदण्यात आला असून, सर्वांत कमी ४३.३ मिमी पाऊस गोंदिया तालुक्यात नोंदण्यात आला आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग - जिल्ह्यात आतापर्यंत पाऊस बरसला नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, आता पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतीची कामे पुन्हा एकदा जोमात सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांची आता पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. पावसाने साथ दिली, तर यंदा नक्कीच चांगले पीक घेऊन शेतकरी फायदा घेतील.

 

टॅग्स :Rainपाऊस