शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शशीकरण पहाडीजवळ वनतलाव होणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:40 IST

तालुक्यातील दल्ली परिसरात वनतलावाची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र अद्यापही ती मार्गी लागली नाही. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वनतलाव केव्हा होणार असा सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यातील दल्ली परिसरात वनतलावाची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र अद्यापही ती मार्गी लागली नाही. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वनतलाव केव्हा होणार असा सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या रेंगेपार सहवनक्षेत्रातील कपांर्टमेंट नंबर ५५२ मधील शशीकरण पहाडीच्या पायथ्याशी असलेल्या वनात वन तलावाची गरज आहे. ५५२ कंपार्टमेंटच्या २ कि.मी. परिसरात कुठेही तलाव नाही. रेंगेपार तलाव, दल्लीचा फुटका बोडी या दोन पाण्याच्या साधनांवर शशीकरण पहाडी व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्य लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. अनेकदा पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वन तलावाचे काम केल्यास वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास मोठी मदत होईल. शशीकरण पहाडी परिसरात घनदाट जंगल आजही पहावयास मिळते. या जंगलात अस्वल, बिबट, हरिण, सांबर, निलगाय, वाघ, रानकुत्री, तडस, रानमांजर आदी प्राणी प्रामुख्याने आढळतात. प्राण्यांना पिण्याचे पाण्याची सोय नसल्यामुळे बरेचदा या जंगलातील वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. यात प्राण्यांना जीव गमवावा लागतो. शंभर वर्षापूर्वी इंग्रजाच्या काळात ५५२ कंपार्टमेंटमध्ये तलाव बांधल्याचे पुरावे आजही आहे. त्या तलावाची पाळ फुटली असल्यामुळे पावसाळ्यात या तलावातील पाणी सरळ जंगलात वाहून जाते. त्यामुळे या तलावाची दुरूस्ती केल्यास तलावात पाणी साठवून ठेवण्यास मदत होईल. तसेच वन्य प्राण्यांना सुध्दा पाण्याची सोय होईल. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वन तलावाची दुरूस्ती करण्याची गरज आहे.

टॅग्स :forestजंगल