शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.अध्यक्षासाठी पूर्वीचेच आरक्षण राहणार लागू ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ओबीसी जागा सर्वसाधारण करून घेण्यात आल्या. त्यानंतर १९ जानेवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षणाचा निर्णय प्रलंबित असल्याने मागील महिनाभरापासून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड अद्यापही झालेली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी (दि.३) सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा आरक्षणाचा तिढा सुटला असून, अध्यक्षपद सर्वसाधारण राहणार असल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ओबीसी जागा सर्वसाधारण करून घेण्यात आल्या. त्यानंतर १९ जानेवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षणाचा निर्णय प्रलंबित असल्याने मागील महिनाभरापासून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड अद्यापही झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतिपदाची आरक्षण सोडत नव्याने काढायची की आधी काढलेले आरक्षण कायम ठेवायचे याबाबत जिल्हा निवडणूक विभागाने ग्रामविकास मंत्रालयाकडे मार्गदर्शन मागविले होते. मात्र ग्रामविकास मंत्रालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात असून, त्यावर गुरुवारी (दि.३) निर्णय झाल्यावर अभिप्राय कळवू, असे जिल्हा निवडणूक विभागाला कळविले होते. मात्र गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद आता सर्वसाधारणच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक घेण्याचा मार्गदेखील जवळपास मोकळा झाला आहे, पण राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी आरक्षणाशिवाय कुठल्याच निवडणुका नको, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामविकास विभाग गोंदिया जि. प. अध्यक्षपदाच्या आरक्षणासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागाला काय अभिप्राय कळविते याकडे लक्ष लागले आहे.

जि. प. पदाधिकाऱ्यांची निवडणूक त्वरित - गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहे. महिनाभराचा कालावधी लोटूनही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे विविध कामे रखडली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीची निवडणूक त्वरित घेण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. 

पदाधिकाऱ्यांचे निवडणुकीकडे लक्ष - जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत सभापतीपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. ग्रामविकास विभागाकडून यासंदर्भातील अभिप्राय प्राप्त होताच निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता त्याकडे लागल्या आहेत.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद