शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

पक्षांनी शोधलेले सरपंच पदाचे उमेदवार परफेक्ट निघतील ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 21:20 IST

कोणताही पक्ष असो राजकारणाची सुरुवात ग्रामपंचायतीपासूनच होत असल्याने राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. म्हणूनच त्यांनाही आता परफेक्ट उमेदवाराची गरज असून ते शोध घेत आहेत. तर दुसरीकडे इच्छुकांकडूनही तयारी सुरू झाली असून भेटीगाठी व जनसंपर्कावर भर दिला जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  येत्या १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जाणार असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापासूनच वातावरण तापले आहे. अशात परफेक्ट उमेदवाराचा पक्षांकडून शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे इच्छुकही आपणच बेस्ट हे दाखवून देण्यासाठी तयारीला लागले आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांसाठी पार्ट्यांचे आयोजनही सुरू झाले आहे. मात्र पक्षांकडून निवडले जाणारे उमेदवार खरोखरच परफेक्ट निघणार काय? याबाबतही नागरिकांत चर्चा सुरू आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींचाही समावेश होत असून येत्या १८ डिसेंबर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका कुठल्याची राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाही; परंतु, राजकीय पक्षांकडून ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी पॅनल तयार करून निवडणूक लढविली जाते. त्यात १५व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व आले आहे. शिवाय सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने राजकीय पक्षांकडून जास्त रस घेतला जात आहे.  निवडणुकीला जरी वेळ असला तरी आतापासूनच जिल्ह्यात गावागावांत राजकीय वातावरण तापू लागले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व आल्याने तरुण वर्गसुद्धा आता सक्रिय झाला असून निवडणुकीला चांगलीच रंगत येत आहे. शिवाय, कोणताही पक्ष असो राजकारणाची सुरुवात ग्रामपंचायतीपासूनच होत असल्याने राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. म्हणूनच त्यांनाही आता परफेक्ट उमेदवाराची गरज असून ते शोध घेत आहेत. तर दुसरीकडे इच्छुकांकडूनही तयारी सुरू झाली असून भेटीगाठी व जनसंपर्कावर भर दिला जात आहे.  काहीही करून जास्तीत जास्त ग्रामपंचायत काबिज करावयाच्या असल्याने नेते मंडळींकडूनही विविध फंडे आजमाविले जात आहेत. यासाठी समविचार पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेत निवडणुका लढण्याचे, बैठका घेऊन योग्य नियोजन करण्याचे  फंडे अवलंबिले जात आहेत. 

कागदपत्रांची जुळवाजुळव- निवडणूक लढवित असताना त्यासाठी आरक्षण किंवा खुले गट अशात विविध कागदपत्रांची गरज असते. यामधील एखादेही कागद सुटू नये, यासाठी इच्छुकांकडून आतापासूनच तयारी सुरू आहे. यासाठी ते संबंधित पक्ष तसेच अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घेत कागपदत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी भिडून आहेत.  

कार्यकर्ता व मतदारांची आवभगत- निवडणुकीत कार्यकर्ता व मतदार या दोघांनाच विशेष महत्त्व असते. यामुळेच इच्छुकांकडून आतापासून आपल्या कार्यकर्ता व मतदारांचे आवभगत सुरू झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, यासाठी पार्ट्यांना सुरुवात झाली असून नॉनव्हेजसोबत शौकिनांसाठी दारूचीही व्यवस्था केली जात आहे. कार्यकर्ता तसेच मतदार नाराज झाले नाही पाहिजे, याची खबरदारी घेतली जात आहे.  

 

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत