शहरं
Join us  
Trending Stories
1
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
2
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
3
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
4
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
5
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
6
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
7
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
8
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
9
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
10
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
11
धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
12
खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार
13
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
14
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
15
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
16
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
17
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
18
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
19
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएलचा दाखला ग्रामपंचायतमधून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 23:57 IST

गोंदिया पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी पं.स.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.आमसभेत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना पंचायत समितीऐवजी ग्रामपंचायत मधून दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर । गोंदिया पंचायत समितीचा निर्णय, आमसभेत ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी पं.स.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.आमसभेत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना पंचायत समितीऐवजी ग्रामपंचायत मधून दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.आमसभेला आ.गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरीणखेडे, गटविकास अधिकारी जावेद ईनामदार, उपसभापती चमन बिसेन यांच्यासह जि.प.व पं.स.सदस्य उपस्थित होते.या वेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी यांनीही आमसभेला मार्गदर्शन केले.सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर उपस्थित होते.या वेळी सरपंच-उपसरंपच संघटनेच्यावतीने काम येणाऱ्या अडचणी सभागृहात मांडण्यात आल्या. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत यावर्षी वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र यासाठी निधी कोण देणार असा सवाल उपस्थित केला. पालकमंत्री पांदन रस्त्यांच्या कामाचा निधी अद्यापही मिळाला नसल्याचा मुद्दा या वेळी उपस्थित करण्यात आला. शासनाच्या नवीन निर्णयामुळे अनेक दाखले ग्रामपंचायतमधून देणे बंद करण्यात आले.त्यामुळे नागरिकांना पंचायत समितीपर्यंत पायपीट करावी लागत आहे. शंकर टेंभरे, चिंतामण चौधरी यांनी गावातील शाळेच्या शिक्षकासंबंधी समस्या मांडल्या.रवी पटले,नरेंद्र चिखलोंडे, युगेश्वरी ठाकरे यांच्यासह सरपंचानी गावातील समस्या मांडल्या.यापैकी बहुतेक समस्यांचे निवारण सभेतच करण्यात आले.नागरिकांना बीपीएल दाखल्यासाठी पंचायत समितीपर्यंत धाव घ्यायची वेळ येऊ नये,यासाठी गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी हे दाखले ग्रामपंचायतमधूनच देण्याची ग्वाही दिली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत