शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पालनासाठी दुधाळ गाय व कोंबडी मिळेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

शेतीसोबतच पशुपालक किंवा शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करता यावा, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा व राज्य पातळीवर योजना राबविण्यात येतात. ४ डिसेंबरपासून या योजनांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये राज्यस्तरीय योजनेत दुधाळ गाय म्हशी वाटप, शेळी मेंढी वाटप, कुक्कुटपालन यासह जिल्हा पातळीवरील योजनेत शेळी, मेंढी गट वाटप करणे, दुधाळू गायी, म्हशी वाटप करणे, एक दिवस सुधारीत पिल्लांचे वाटप करणे यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  पशुपालकांना पशुसंवर्धन खात्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ देण्यात येतो. हा लाभ घेता यावा, यासाठी पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हा व राज्यस्तरीय अशा दोन प्रकारात ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. घरी बसूनच मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे होते. पहिल्या टप्यात अर्जच आले नाही. मुदत वाढल्याने दुसऱ्या वेळी गोंदिया जिल्ह्यातून गाय-म्हैस, शेळी व कुक्कुट योजनेसाठी ३०३५ अर्ज आले आहेत. या योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला असता परंतु जिल्ह्यात आचारसंहिता असल्याने पशुसंवर्धन विभागाने अर्ज मागविण्यासाठी प्रसिध्दीच केली नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकही अर्ज आला नाही. शेतीसोबतच पशुपालक किंवा शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करता यावा, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा व राज्य पातळीवर योजना राबविण्यात येतात. ४ डिसेंबरपासून या योजनांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये राज्यस्तरीय योजनेत दुधाळ गाय म्हशी वाटप, शेळी मेंढी वाटप, कुक्कुटपालन यासह जिल्हा पातळीवरील योजनेत शेळी, मेंढी गट वाटप करणे, दुधाळू गायी, म्हशी वाटप करणे, एक दिवस सुधारीत पिल्लांचे वाटप करणे यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या योजनेसाठी अर्जच मागविले नव्हते. परंतु मुदत वाढल्याने आता ३०३५ अर्ज आले आहेत, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांनी सांगितले.

ऑनलाईन अर्ज केले- कोरोनाच्या काळात या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी एएच डॉट महाबीएमएस डॉट कॉम या संकेतस्थळावर, तसेच एएच महाबीएमएस या ॲपवर अर्ज करण्यात आले.

अर्ज ९०० जणांची निवड- जिल्ह्यात ३०३५ अर्ज करण्यात आले. यातील ९०० जणांची निवड करण्यात आली आहे. ज्यांना लाभ मिळेल त्यांचे नाव कमी होईल. विभागाच्या संकेतस्थळावर, तसेच ॲपवर ऑनलाईन अर्ज करण्यात आले. ज्यांना यंदा लाभ मिळणार नाही त्यांच्या अर्जाचा विचार पुढील वर्षी प्रतीक्षा यादीनुसार होईल.

पशुसंवर्धन अधिकारी म्हणतात...

पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तयरीय विविध वैयक्तिक योजना राबविल्या जातात. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले जातात. २०२१-२२ या वर्षासाठी जिल्ह्यात ३०३५ अर्ज आले आहेत. - डॉ. कांतीलाल पटले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी गोंदिया.

 

टॅग्स :Farmerशेतकरी