शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

कोरोना योद्धांच्या कुटुबीयांना ५० लाखांची मदत मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना योध्दांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. दोन पोलीस व महसूल विभागातील दोन कर्मचारी अश्या एकूण ११ जणांचा कोरोना योध्दा म्हणून नोकरी करताना मृत्यू झाला. या ११ पैकी पोलीस विभागाचे दोन प्रस्ताव शासनाला गेले आहेत. त्यापैकी पोलीस विभागातील दोन पैकी राजेश दोनोडे यांचा प्रस्ताव काल (दि.५) रोजी मजंूर झाला.

ठळक मुद्देआरोग्य विभागाने स्वत:बरोबर दुसऱ्यांची घेतली काळजी

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोदिया : कोरोनाच्या महामारीत लोकांची काळजी घेता घेता स्वत:चे जीवन वाहून देणाºया कोरोना योध्दांना वीर मरण पत्कारावे लागले. त्या मृत पावलेल्या योध्दांना शासनाने ५० लाखाचे विमा सुरक्षा कवच लागू केले होते.गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना योध्दांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. दोन पोलीस व महसूल विभागातील दोन कर्मचारी अश्या एकूण ११ जणांचा कोरोना योध्दा म्हणून नोकरी करताना मृत्यू झाला. या ११ पैकी पोलीस विभागाचे दोन प्रस्ताव शासनाला गेले आहेत. त्यापैकी पोलीस विभागातील दोन पैकी राजेश दोनोडे यांचा प्रस्ताव काल (दि.५) रोजी मजंूर झाला. येत्या दोन चार दिवसात इमरान काजी यांचाही प्रस्ताव मंजूर होणार असल्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सांगितले. सात शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला. परंतु यातील दोनच शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. पाच शिक्षकांचे प्रस्तावच आले नाहीत. जे दोन प्रस्ताव आले त्यापैकी ते दोन्ही ही शासनाच्या अटीत बसत नसल्याचे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी सांगितले. कोरोना झाल्याच्या १४ दिवसात कोरोनाची नोकरी बजावली आहे का? व तो कोरोना पॉझिटिव्ह आहे का हे दोन्हीही गोष्टी चाचपणी केल्यानंतर कोरोना योध्दाचा विमा कवच दिले जात असल्याचे हिवारे यांनीे सांगितले.कोरोना योद्ध्यांना सलामराजेश दोनोडेकर्तव्य बजावताना माझ्या पतीला कोरोनाची लागण झाली.परिणामी उपचारादरम्यान वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. पोलीस विभागाने तत्परता दाखवून विम्याचे ५० लाख रूपये मंजूर करवून दिल्याची माहिती किशोरी दोनोडे यांनी दिली.इमरान काजीरामनगर पोलीस ठाण्यातील इमरान काजी यांचा कोरोनाने मृत्यू झाला. अजूनपर्यंत कोरोना योध्दांचा विमा सुरक्षा कवच म्हणून शासनाने ठरविलेली रक्कम मिळाली नाही. प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले असे शबाना काजी म्हणाल्या.टाकीलाल सोनवानेघरातील आधारस्तंभच हरविल्याने उपजिवीका कशी चालवायची हा प्रश्न पुढे आहे. वडिलांच्या मृत्यूला आता महिना होत असूनही यासंदर्भात प्रस्तावही मागविले नाही,असे काटीलाल सोनावने यांचे चिरंजीव सौरभ म्हणाले.कमलकिशोर परिहारघरातील कर्तेधर्ते वडीलच असल्याने कुटुंबाचा कण मोडला.मोडलेल्या कणा कसा सावरायचा हे कळत नाही. कोरोना योध्दांना शासनाने विमा कवच देण्याचे म्हटले होते. पण माहिती मागीतली नाही असे हर्षीत परिहार म्हणाले.कोरोना योध्दांना विमा कवच म्हणून शासनाने ५० लाख रुपयांचा विमा काढला होता. यासंबंधीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मदत दिली जाईल. कोरोना योध्दांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची जिल्हा प्रशासन निश्चितच काळजी घेईल.- दीपक कुमार मीणा, जिल्हाधिकारी, गोंदिया

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या