शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

मजुरीपासून विधवा आजही वंचित

By admin | Updated: February 20, 2017 00:51 IST

तिरोडा तालुक्याच्या खोपडा (बयवाडा) येथील एका विधवा महिलेने मागील वर्षी २०१६ मध्ये केलेल्या मग्रारोहयोच्या कामाची मजुरी आजही मिळाली नाही.

सरपंचाची मनमानी : १५० रूपये न दिल्याने कामावर घेण्यास टाळाटाळकाचेवानी : तिरोडा तालुक्याच्या खोपडा (बयवाडा) येथील एका विधवा महिलेने मागील वर्षी २०१६ मध्ये केलेल्या मग्रारोहयोच्या कामाची मजुरी आजही मिळाली नाही. सरपंच व रोजगार सेवक सहकार्य करण्याऐवजी धमकावणी देत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. ताराबाई वासुदेव वासनिक (५०) असे त्या पीडित महिलेचे नाव आहे. तिने फेब्रुवारी ते जून २०१६ पर्यंत खोपडा-येडमाकोट-सिल्ली रस्त्याचे काम, ईसापूर तळ्याचे काम, ईसापूर-खोपडा रस्त्याचे काम केले आहे. परंतु आज वर्षभराचा कालावधी लोटल्यावरही तिला केलेल्या कामाची मजुरी मिळाली नाही. ताराबाईने सांगितले की, आपला कोणी आधार नाही. परिस्थिती दयनिय असून आपल्याचा कुणाचे सहकार्य मिळत नाही. तेथील सरपंच तुझे पैसे खाल्ले का, अशा शब्दात बोलतो. रोजगार सेवक शिवा सुखदेव जगनाडे म्हणतो की, तुझा कोणी आधार नाही. त्यामुळे कोठेही जाशिल तरी वेतन मिळणार नाही, असे ताराबाईने सांगितले.तिने दिलेल्या माहितीनुसार, रोजगार सेवक व सहायक अभियंता मिळून मजुरी अधिक काढून देणार, असे सांगितल्याने दरदिवस १० रूपये याप्रमाणे आपण आठवड्याला त्यांना जवळचे पैसे देत होतो. हे पैसे गँगमेटद्वारे दिले जात होते. मागील वर्षाची मजुरी मिळाली नाही. यासाठी रोजगार सेवक, सरपंच यांच्यासह मुंडीकोटा बँकेच्या व्यवस्थापकांकडे खात्यात मजुरी जमा झाली की नाही, हे विचारण्यास गेली असता नकारात्मक उत्तर देण्यात आले. या प्रकारामुळे सदर विधवा महिलेवर उपासमारीची पाळी ओढवते.ताराबार्इंनी लोकप्रतिनिधींकडेही धाव घेतली. माजी आ. दिलीप बन्सोड यांच्याजवळ आपली व्यथा सांगितली. त्यांनी विस्तार अधिकारी कांबळे यांच्याशी बोलून सदर महिलेची समस्या सोडवावी, असे सांगितले.यावर सदर प्रकरणाची तक्रार आपल्या कार्यालयाला उपलब्ध झाली नाही. तक्रार येताच दखल घेतली जाईल, असे आश्वासन कांबळे यांनी दिले. (वार्ताहर)आपल्याकडे मागणी करण्यात आली नाही. ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी तक्रार नोंदविणे गरजेचे होते. वेतन आॅनलाईन असल्याने अशी परिस्थिती निर्माण होत आहे.-सतीश कांबळे,विस्तार अधिकारी, (मग्रारोहयो), तिरोडा.