शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील २७ रेती घाटांपैकी १६ रेती घाटांचे लिलाव पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने झाले नाही. मात्र, यानंतरही या रेती घाटांवरून सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे. जिल्ह्यात सध्या एक ट्रॅक्टर रेतीचे दर ८ हजार रुपये सुरू आहे. घाटांचे लिलाव झाले नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात या रेती घाटावरून रेतीची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ही रेती कुठल्या घाटावरून येत आहे हे मात्र समजण्यापलीकडे आहे. जिल्ह्यात रेतीची तस्करी जाेमात सुरू असून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात सध्या रेतीची तस्करी जोरात असून यातून अनेक तस्कर गब्बर झाले असून, ते सबकुछ मॅनेज है ची भाषा करीत आहे. रेती घाटावरून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती तस्करांनीच वेळा देखील ठरविल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून जिल्हा खनिकर्म विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली असल्याने रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील २७ रेती घाटांपैकी १६ रेती घाटांचे लिलाव पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने झाले नाही. मात्र, यानंतरही या रेती घाटांवरून सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे. जिल्ह्यात सध्या एक ट्रॅक्टर रेतीचे दर ८ हजार रुपये सुरू आहे. घाटांचे लिलाव झाले नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात या रेती घाटावरून रेतीची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ही रेती कुठल्या घाटावरून येत आहे हे मात्र समजण्यापलीकडे आहे. जिल्ह्यात रेतीची तस्करी जाेमात सुरू असून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र, खनिकर्म विभागाचे अधिकारी केवळ नाममात्र कारवाई करून मोकळे होण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेती तस्करांना मोकळे रान आहे. रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल केला जात आहे.  

दखल घेणार कोण?- रेती तस्करीत राजकारणाशी संबंधित काही जण रेती तस्करीत सहभागी असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर या सर्व प्रकाराची दखल घेऊन कारवाई करणार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कारवाई करताच वरिष्ठांचे फोन - रेतीची तस्करी करताना वाहने पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारीच तो आपला माणूस आहे, कारवाई करू नका असे सांगून कारवाई न करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा पर्याय नसतो. दोन दिवसांपूर्वीच असा प्रकार एका तालुक्यात घडला. यासाठी थेट जिल्हा खनिकर्म विभागातून फोन आल्याची माहिती आहे. 

रेती तस्कर म्हणतात सबकुछ मॅनेज है- मागील तीन-चार महिन्यांपासून जिल्ह्यात रेतीची तस्करी जोरात सुरू आहे. त्यामुळे रेती तस्कर चांगले मालामाल झाले असून, त्यांच्याकडील वाहनांची संख्यादेखील दुप्पट झाली आहे. तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने रेतीची तस्करी सुरळीत आहे. त्यामुळे ते छातीठोकपणे सबकुथ मॅनेज असल्याचे सांगत आहे. 

 

टॅग्स :sandवाळू