शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आज होणार स्पष्ट गावचा प्रमुख कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:00 IST

ग्रामपंचायतच्या राजकारणातून अनेक नेते घडल्याची उदाहरणेसुध्दा जिल्ह्यात आहेत. तसेच ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायतची निवडणूक महत्त्वपूृर्ण समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे गांभीर्याने बघतात. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. मात्र, यंदा राज्य निवडणूक आयोगाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर केले. त्यामुळे सदस्य निवडून आले तरी सरपंचपदी कोण आरुढ होणार हे स्पष्ट झाले नव्हते.

ठळक मुद्दे१७५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड प्रक्रिया : ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला पार पडली. त्यानंतर २८ जानेवारीला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आता आरक्षणानुसार सरपंच व उपसरपंचपदी सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया शुक्रवारी (दि.१२) पार पडणार आहे. त्यामुळे आपल्या गावचा प्रमुख कारभारी कोण, याचे चित्र शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या निवडप्रक्रियेला घेऊन फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या आणि येथूनच पुढे जि. प. अध्यक्ष, आमदार, खासदार आणि मंत्री पदापर्यंत मजल मारली जाते. ग्रामपंचायतच्या राजकारणातून अनेक नेते घडल्याची उदाहरणेसुध्दा जिल्ह्यात आहेत. तसेच ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायतची निवडणूक महत्त्वपूृर्ण समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे गांभीर्याने बघतात. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. मात्र, यंदा राज्य निवडणूक आयोगाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर केले. त्यामुळे सदस्य निवडून आले तरी सरपंचपदी कोण आरुढ होणार हे स्पष्ट झाले नव्हते. त्यानंतर २८ जानेवारीला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता शुक्रवारी (दि. १२) सरपंच आणि उपसरपंचाची निवडप्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतनिहाय निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील १७५ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच निवडण्याची प्रक्रिया निवडून आलेले सदस्य पार पाडणार आहेत. त्यामुळे या निवडप्रक्रियेला घेवून गावकऱ्यांतसुध्दा प्रचंड उत्साह आहे. 

सत्ता कोणाची होणार स्पष्ट ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपले सदस्य निवडून आल्याचा दावा केला होता. तसेच निवडून आल्यानंतर जो-तो आपलाच म्हणत सुटला होता. मात्र, आता शुक्रवारी सरपंचपदाची निवड केली जाणार असून कोणत्या पक्षाचा सदस्य ग्रामपंचायमध्ये विराजमान होतो यानंतरच त्या ग्रामपंचायतवर कोणत्या पक्षाची सत्ता हे देखील स्पष्ट होणार आहे. 

पर्यटनाला गेलेले सदस्य परतणार आज सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीदरम्यान फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये फूट पडू नये यासाठी निवडून आलेल्या सर्व पॅनलच्या सदस्यांनी खबरदारी घेतली आहे. यासाठी सरपंचपदाची निवडणूक जाहीर होईपर्यंत आपल्या सदस्यांना बाहेरगावी पर्यटनाला पाठविले होते. आता हे सर्व सदस्य शुक्रवारी आपल्या गावी परतणार आहेत. सर्व राजकीय पक्षांचे लक्ष जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाची सत्ता स्थापन व्हावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आता सरपंच निवडीदरम्यान या सर्वांचा कस लागणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मागील तीन चार दिवसांपासून यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच