शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगड यात्रेकरिता व्हाईट आर्मी सज्ज

By admin | Updated: March 4, 2016 01:52 IST

जिल्हयात महाशिवरात्री सणाच्या निमित्ताने प्रतापगड येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रेचे आयोजन केले जाते.

गोंदिया : जिल्हयात महाशिवरात्री सणाच्या निमित्ताने प्रतापगड येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रेचे आयोजन केले जाते. या दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये व भाविकांना यात्रेचा आनंद मोकळेपणाने घेता यावा याकरिता व्हाईट आर्मी सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले.जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत व्हाईट आर्मी यात्रेत सहभागी करु न घेण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, पोलिस उपअधीक्षक गृह सूरेश भंवर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक धूमाळ, संबंधित विभागाचे अधिकारी व व्हाईट आर्मीचे व्हॉलींटिअर्स उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी यात्रेदरम्यान स्वच्छता, शांतता व सूव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक प्रशासन यंत्रणेला मदत करण्याचे काम व्हाईट आर्मीद्वारे केले जाईल असे सांगितले. व्हाईट आर्मीची जबाबदारी व कामाचे स्वरु प सांगताना त्यांनी फायर अ‍ॅन्ड सेफ्टी, प्रथमोपचार यासारखी कामे करावी असे सांगितले. तसेच व्हाईट आर्मीने त्यांच्या कामाचे नियोजन, माहिती, केलेली कार्यवाही व समस्येवर केलेली उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती पोलिस विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना देणे गरजेचे असल्याचे सांगितले. या बैठकीमध्ये प्रतापगड यात्रेतील पार्र्कींंगव्यवस्था, विद्युत पुरवठा, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, कचरा व घाण टाळण्यासाठी केलेले उपाय, असामाजिक तत्वाद्वारे पसरविल्या जाणार्या अफवा, चेंगरा-चेंगरी व गिर्दच्या ठिकाणी वेळेवर उद्भवणार्या समस्या या विषयांवर चर्चा करण्यात आली. युवकांनी व्हाईट आर्मीत सहभागी होण्याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचेशी संपर्क साधावा अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सूर्यंवंशी यांनी यावेळी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)