शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार रुपयांची लाच घेताना उपसरपंच जाळ्यात

By admin | Updated: August 27, 2014 23:40 IST

अदासी ग्रामपंचायतच्या हद्दीत खरेदी केलेल्या प्लॉटसंबंधी ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवर नाव चढवून कर आकारणी करून घेण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेणारे अदासीचे उपसरपंच

एसीबीची कारवाई : ग्रा.पं. रेकॉर्डवर नाव चढविण्याचा विषयगोंदिया : अदासी ग्रामपंचायतच्या हद्दीत खरेदी केलेल्या प्लॉटसंबंधी ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवर नाव चढवून कर आकारणी करून घेण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेणारे अदासीचे उपसरपंच मनोहर मंगल दूधबर्वे (४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.२७) दुपारी १२.१५ वाजता करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे माजी सैनिक असून त्यांचा पानठेल्याचा व्यवसाय आहे. सन २०१२ मध्ये त्यांनी व त्यांच्या भावाने मिळून अदासी गावाच्या हद्दीतील १५०० वर्गफूट जागा एक लाख ९० हजार रूपयांत खरेदी केली होती. सदर प्लॉट शासकीय योजनेंतर्गत स्व.पांडुरंग माने रा.अदासी यांना सन १९८७ मध्ये शासनाकडून मिळालेला होता. त्याचे विक्रीपत्र होत नसून ग्रामपंचायतच्या अभिलेखावर केवळ मालकी हक्क हस्तांतरित होते. त्याच नावाने कर आकारणी होत असते. अमृत डोंगरे व इतर सहा जण हे सदर प्लॉटचे वारसदार आहेत.सदर प्लॉट खरेदी केल्याच्या करारनाम्यानंतर ग्रामपंचायत अदासीच्या रेकॉर्डवर तक्रारदार व त्याच्या भावाचे नाव चढवून कर आकारणी करून घेण्यासाठी मूळ प्लॉटधारकांच्या वारसदारांनी अदासीचे ग्रामसेवक राणे यांच्याकडे डिसेंबर २०१२ मध्ये अर्ज केला होता. मे २०१४ मध्ये ग्रामविकास अधिकारी राणे व उपसरपंच दूधबर्वे यांनी तक्रारदाराला त्यांच्या प्लॉटला लागूनच शासकीय विहीर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी तुम्हाला रस्ता सोडावा लागेल असे सांगून तसे प्रतिज्ञापत्र द्या, नंतर तुमच्या कामाचे बघू असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने २१ मे २०१४ रोजी प्रतिज्ञापत्र तयार केले व ते ग्रामपंचायतमध्ये गेले. त्यावेळी उपसरपंच दूधबर्वे यांनी तक्रारदारास त्यांना मेन रोडची जमीन स्वस्तात मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे व राणेचे प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण १० हजार रूपये दिल्याशिवाय काम होणार नाही, असे सांगितले. २२ आॅगस्ट २०१४ रोजी उपसरपंच दूधबर्वे याने तक्रारदाराच्या दुकानात येवून काम करून देण्यासाठी १० हजार रूपयांची पुन्हा मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने दोन हजार रूपये दिले. तसेच २६ आॅगस्ट रोजी उरलेल्या आठ हजार रूपयांमधून एक हजार रूपये घेतले. तसेच उर्वरित सात हजार रूपये घेवून २७ आॅगस्ट रोजी अदासी ग्रामपंचायतमध्ये बोलावले. उपसरपंच दूधबर्वे यांना उर्वरित सात हजार रूपये लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून अदासी गावात सापळा रचण्यात आला. उपसरपंच दूधबर्वे याने प्लॉटसंबंधी तक्रारकर्त्याचे नाव ग्रामपंचायत रेकार्डवर चढवून घेण्यासाठी पंचासमक्ष सात हजार रूपयांची मागणी केली. तक्रारकर्त्याने ती रक्कम दिली. ही लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. दूधबर्वे याच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)