शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

कुठे बनणार प्रथम श्रेणी पशु चिकित्सालय?

By admin | Updated: December 21, 2014 23:02 IST

जिल्हा पशू संवर्धन विभाग व बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या गैरसमजुतीमुळे दासगाव येथे बांधकाम करण्यात येणाऱ्या प्रथम श्रेणी पशु चिकित्सालयाचे बांधकाम अपूर्ण पडून आहे.

गोंदिया : जिल्हा पशू संवर्धन विभाग व बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या गैरसमजुतीमुळे दासगाव येथे बांधकाम करण्यात येणाऱ्या प्रथम श्रेणी पशु चिकित्सालयाचे बांधकाम अपूर्ण पडून आहे. हे त्या अधिकाऱ्यांच्या गैरसमजुतीमुळे झाले की जेथे काम करणे गरजेचे होते, तेथे न करता दुसऱ्याच ठिकाणी काम सुरू करण्यात आले. आता त्याच्या परिणामाकडे दुर्लक्ष करून हे अधिकारी आपली चूक एक-दुसऱ्यावर थोपवित आहेत.गोंदिया जिल्हा परिषदेच्या पशू संवर्धन विभागाच्या वतीने दासगाव येथे प्रथम श्रेणीचे पशू चिकित्सालय मंजूर करण्यात आले. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दासगाव खुर्द पंचायतच्या अधिकाऱ्यांना फोन करून मंजूर पशू चिकित्सालयासाठी प्रस्ताव पारित करण्याची सूचना दिली. एवढेच नव्हे तर त्यांना पशू चिकित्सालयासाठी जागेचा प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देशही दिले. त्या निर्देशाच्या आधारावर दासगाव खुर्द पंचायतने २० मे २०१३ रोजी सभेत प्रस्ताव पारित करून पशू चिकित्सालयाच्या बांधकामास मंजुरी दिली. यानंतर २७ मे २०१३ रोजी दासगाव खुर्द येथील गट-८८६ च्या जागेचा नकाशा व सात-बारा जि.प. च्या पशू संवर्धन विभागास पाठविण्यात आला. यानंतर दासगाव पंचायतकडून बांधकामाबाबत ना हरकत प्रमाणपत्र मागण्यात आले. १३ आॅगस्ट २०१४ रोजी दासगाव पंचायतीने ना हरकत प्रमाणपत्रही दिले. जि.प. च्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता शुक्ला यांनी प्रस्तावित स्थळी जावून निरीक्षण केले व त्या ठिकाणी जागेचे खोदकाम सुरू करण्यात आले. काही दिवसांनंतर अचानक काम थांबविण्यात आले. दासगाव खुर्दच्या ग्रामस्थांना काही दिवसानंतर माहिती मिळाली की, त्यांच्या गावचे काम थांबवून दासगाव बु. येथे सुरू करण्यात आले आहे. सदर माहिती मिळताच ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या विविध अधिकाऱ्यांना निवेदन दिले व मंजूर केलेल्या ठिकाणीच काम सुरू करण्याची मागणी केली. दासगाव खुर्दचे उपसरपंच सतीश कोल्हे, सदस्य सुकलाल बोपचे, अमृतलाल रहांगडाले व माजी ग्रा.पं. सदस्य अनिल बावणकर यांनी सांगितले की, त्यांच्या गावात मंजूर करण्यात आलेल्या प्रथम श्रेणी पशू चिकित्सालयाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. असे न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारासुद्धा दिला आहे. ग्रामस्थांनी म्हटले आहे की, जि.प. सदस्य रूद्रसेन खांडेकर यांनीसुद्धा दासगाव खुर्दच्या दाव्याला योग्य सांगितले आहे. एकाच कामाचे दोन ले-आऊट कसे घेण्यात आले? दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत भूमिपूजन करून खोदकाम सुरु करण्यात आले आहे.याबाबत जिल्हा परिषदेचे पशू संवर्धन अधिकारी एम.एस. चव्हाण यांच्याशी चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, दासगाव बु येथे २५ वर्षांपासून पशू रूग्णालय सुरू आहे. प्रथम श्रेणी पशू संवर्धन रूग्णालयाच्या बांधकामास मंजुरी दासगावात मिळाली आहे. तेथे कोणतेही खुर्द किंवा बु. नमूद नाही. त्यामुळेच दासगाव खुर्द पंचायतकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले. परंतु जेव्हा दासगाव बु. चे नागरिक अधिकारी-पदाधिकाऱ्यांकडे गेले, तेव्हा चूक समजून आली व दासगाव खुर्दचे काम थांबवून दासगाव बु. येथे काम सुरू करण्यात आले. तसेच २५ वर्षांपासून दासगाव बु. येथे पशू चिकित्सालय आहे. आता श्रेणी वाढविण्यात आली, तर पहिला अधिकार दासगाव बु.चाच आहे, असेही जिल्हा पशू संवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या वादामुळे दोन्ही गावांतील नागरिक एकमेकाविरूद्ध उभे झाले आहेत. आता त्यांच्या वाद कुठपर्यंत पोहचतो व अधिकारी या वादविवादाला कसे सोडवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परंतु केवळ एका अधिकाऱ्याच्या गैरसमजुतीमुळे दोन्ही गावांत शत्रुतेची रेषा ओढली गेली, हेही तेवढेच सत्य. (प्रतिनिधी)