शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

लाखो क्विंटल तांदूळ ठेवायचा कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:56 PM

मागील आठ ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रथमच जिल्ह्यातील शासकीय गोदामे तांदळाने हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे नवीन भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न आता जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील गोदाम झाले हाऊसफुल : नवीन तांदूळ ठेवण्याची समस्या, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठ ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रथमच जिल्ह्यातील शासकीय गोदामे तांदळाने हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे नवीन भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न आता जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. गोदामातील तांदळाची उचल करण्यासंदर्भात अद्याप शासनाने कुठलेच नियोजन केले नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.गोंदिया जिल्ह्यात राईसमिलची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गोंदिया-भंडारा या दोन जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत दोन्ही जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. त्यानंतर खरेदी केलेला धान भरडाई करण्यासाठी राईसमिल धारकांना निविदा काढून दिला जातो.राईसमिल धारक धानाची भरडाई करुन तांदूळ जमा करतात. त्यानंतर या तांदळाचा जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो.जिल्ह्यात दरवर्षी १३ ते १४ लाख क्विंटल तादंूळ जमा केला जातो. तर यापैकी जिल्ह्यात केवळ ४ लाख क्विंटल तांदळाची मागणी आहे.त्यामुळे जवळपास १० लाख क्विंटल तांदूळ शासकीय गोदामांमध्ये शिल्लक राहतो. शिल्लक असलेला तांदूळ पुरवठा विभागाकडूृन नियोजन करुन इतर जिल्ह्यात पाठविला जातो. दरवर्षी जिल्ह्याबाहेर तांदूळ पाठविण्याचे नियोजन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून केले जात होते.मात्र यावर्षीपासून विभागीय आयुक्त कार्यालयाचे नियोजनाचे अधिकार काढून घेण्यात आले आहे. आता हे अधिकार अन्न व पुरवठा मंत्रालयाकडे आहेत. मात्र या विभागाकडून अद्यापही कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. शिवाय त्यासंदर्भात कुठलेच आदेश जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ शिल्लक आहे.सध्या स्थितीत जिल्ह्यातील गोदामांमध्ये २५ हजार मॅट्रीक टन आणि भारतीय खाद्य मंडळाकडे ३५०० मॅट्रीक टन तांदूळ शिल्लक आहे. तर २०१८ मध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने राईसमिल धारकांना भरडाईसाठी दिलेल्या ५० हजार क्विंटल तांदूळ ३० जूनपर्यंत येणार आहे.त्यामुळे आधीच गोदामात शिल्लक असलेल्या तांदळाची उचल झाली नसल्याने नवीन भरडाई करुन येणारा ५० हजार क्विंटल तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न या दोन्ही विभागांपुढे निर्माण झाला आहे.-तर धानाची भरडाई थांबणारगोदामांमध्ये शिल्लक असलेल्या तांदळाची उचल करुन गोदाम खाली न केल्यास नवीन तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हा तांदूळ तसाच पडून राहिला तर तांदूळ खराब होवू शकतो. राईसमिल धारकांकडे पूर्वीचाच तांदूळ शिल्लक आहे. त्याच तांदळाची उचल झाली नसल्याने उर्वरित धानाची भरडाई थांबवावी लागणार आहे. मात्र यावर अद्यापही शासनाने कुठलाच निर्णय घेतला नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.कुठे किती तांदूळ शिल्लक ?जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत दरवर्षी १६ लाख क्विंटल धानाची खरेदी केली जाते. त्यानंतर हे धान भरडाई करण्यासाठी १२५ राईस मिल धारकांकडे पाठविला जातो. राईस मिलधारक धानाची भरडाई करुन तांदूळ तयार करतात. १ क्विंटल धानापासून ६७ क्विंटल तांदूळ तयार होते. सध्या स्थितीत गोंदिया येथील गोदामात १० हजार २५० मॅट्रीक टन, आमगाव ६ हजार मॅट्रीक टन, गोरेगाव १ हजार, सौंदड ५००, देवरी १ हजार, नवेगावबांध १ हजार, अर्जुनी मोरगाव येथील गोदामात ५ हजार मॅट्रीक टन तांदूळ शिल्लक आहे. या गोदामांची जेवढी क्षमता आहे तेवढा तांदूळ गोदामांमध्ये भरला आहे. त्यामुळे नवीन येणार तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याचे पद रिक्तगोंदिया येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याची दोन महिन्यापूर्वी बदली झाली. त्यांच्या जागेवर अद्यापही शासनाने दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली नाही. त्यामुळे सुध्दा अडचण निर्माण होत आहे.अधिकार कपात व नियोजनाचा फटकाभरडाई केलेला तांदूळ जिल्ह्याबाहेर पाठविण्यासाठी पूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नियोजन केले जात होते. मात्र यावर्षीपासून शासनाने त्यांचे अधिकार कपात केले. त्यामुळेच भरडाई केलेला लाखो क्विंटल तांदूळ गोदामांमध्ये तसाच पडून आहे. यासंदर्भात या विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता शासनाकडून अद्यापही कुठलेच नियोजन झाले नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले.

टॅग्स :Governmentसरकार