शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

युवकांना रोजगार केव्हा देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच क्षेत्राचे खासदार व आमदारांनी सुद्धा या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : मुंडीपार येथे ओपन कबड्डी स्पर्धेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच क्षेत्राचे खासदार व आमदारांनी सुद्धा या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही सर्व आश्वासने पूर्णपणे फोल ठरली आहेत.आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये अद्यापही एक मोठा उद्योग सुरू झाला नाही. तर पर्यटन स्थळांचा सुध्दा विकास झालेला नाही. हे सरकार केवळ घोषबाज सरकार असून युवकांना रोजगार केव्हा उपलब्ध करुन देणार असा सवाल काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केला. सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथील जि.प. शाळेच्या पटांगणावर शनिवारी (दि.१०)ओपन कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.जय बजरंग कबड्डी क्रीडा मंडळ मुंडीपारच्यावतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि माजी मंत्री भरत बहेकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.या प्रसंगी सालेकसाचे सभापती अर्चना राऊत, जि.प.सदस्य विजय टेकाम, मुंडीपारच्या सरपंच मंजू राऊत, उपसरपंच उषा नागपुरे,यादवलाल बनोटे, वसंत पुराम, बळीराम कोटवार, माजी सरपंच घनशाम नागपुरे, किरण वाघमारे, माजी उपसरपंच बलीराम बसोने, तंटामुक्ती अध्यक्ष रेखमचंद उपराडे, माजी ग्रा.पं.सदस्य अमरचंद जमदाड, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दयाराम चोडाये, सहायक शिक्षक कोरे, कुंभरे, दमाहे, ढेकवार यांच्यासह मुंडीपार परिसरातील क्रीडाप्रेमी उपस्थित होते.या वेळी भरत बहेकार यांनी, वर्तमान भाजप सरकार शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व सर्व सामान्याच्या हिताचे नाही. केवळ विकासाचे मोठी आश्वासन देणारे सरकार असल्याचा आरोप केला. उपस्थित मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व संचालन मंडळाचेअध्यक्ष गुमानसिंग उपराडे यांनी केले तर आभार माजी सरपंच घनशाम नागपुरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष गुमानसिंग उपराडे,उपाध्यक्ष महेश वाघमारे,सचिव सुकदास लिल्हारे व कोषाध्यक्ष ईश्वर नागपुरे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :congressकाँग्रेस