शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्या झोपडीत दिवा लागणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:05 IST

शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले कुडवा हे गाव. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला वसलेली मांग गारूडी समाजाची वस्ती. या वस्तीतील मांग गारूडी समाजाच्या लोकांना मुुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर या मागील आठ-दहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्देशासन प्रशासनाचे दुर्लक्ष : मांग गारूडी समाजाची वस्ती, केवळ पोकळ आश्वासनेच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले कुडवा हे गाव. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला वसलेली मांग गारूडी समाजाची वस्ती. या वस्तीतील मांग गारूडी समाजाच्या लोकांना मुुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर या मागील आठ-दहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. वस्तीतील मुले चांगल शिक्षण घेवून या प्रवाहातून बाहेर यावी, त्यांना वसतिगृहात आणि चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी सुध्दा त्या आणि त्यांचे पती धनेंद्र भुरले हे प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या वस्तीमध्ये अद्यापही वीज पोहचली नसून अंधाराचे साम्राज्य कायम आहे. त्यामुळे झोपडीत दिवा त्यांच्या लागणार केव्हा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मांग गारूडी समाजातील वस्तीतील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी एनएनबीवायच्या मदतीने संध्याकाळी विद्यार्थ्यांना शिकविले जाते. त्यामुळे या वस्तीतील मुलांना अक्षर ओळख होवू लागली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या वस्तीतील नागरिकांना त्यांचे अधिकारी मिळावे यासाठी सविता बेदरकर यांचा खटोटोप सुरु आहे.राजकारण्यापासून ते समाजकारण्यापर्यंत प्रत्येकांना या वस्तीत नेऊन त्यांच्या समस्यांची जाणीव करुन दिली. त्यांच्या लढ्याला थोड्याफार प्रमाणात यश आले. त्यांना आता हक्काची जागा मिळाली. मात्र त्यांच्या इतर समस्या कायम आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून अतिक्रमण करून वसवलेली ही वस्ती आता अण्णाभाऊ साठेनगर या नावाने ओळखली जाऊ लागली आहे.इंडसच्या मदतीने वस्तीत शाळा सुरू करण्यात आली होती. मात्र ती सुद्धा बंद पडली आहे. पूर्वी मालिश करणे, दायीचे काम करणे असा पूर्वापार व्यवसाय हा समाज करायचा. मांग गारूडी समाजाच्या वस्तीत भीक मागून, कबाडी वेचून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गलीच्छ राहतात म्हणून त्यांना कोणी काम द्यायला तयार नाही.काम मिळत नाही म्हणून त्यांचे गलिच्छ राहणं सुधारत नाही. अशा दृष्टचक्रात हा समाज गुरफटलेला आहे. आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत त्यांच राहणीमान सुधारणार नाही.रोजगाराची समस्याया वस्तीतील नागरिकांचा सर्वात मोठा प्रश्न हा रोजगाराचा आहे. त्यामुळे किमान आम्हाला सफाई कामगार म्हणून तरी नोकरी द्या अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. वंचितांच्या आयुष्यात कधी उजेड येईल का? इथं नेतागिरी करण्यासाठी खूप जण येतात. पण त्यांच्या मूलभूत गरजा आणि रोजगाराच्या संधी देण्यासाठी काय करता येईल असा ठोस कार्यक्रम इथे कुणीच राबवत नाही.त्यांच्या राहणीमानावर टीका होते. पण त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी काय करता येईल का यावर कुणीच मंथन करीत नाही.पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीयेथील मांग गाऊडी वस्तीत अद्यापही विविध सोयी सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील महिलांना वस्तीपासून तीन दोन कि.मी.अंतरावर पाणी आणण्यासाठी जावे लागते. निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागण्यासाठी येणारे राजकारणी सुध्दा निवडणुकीनंतर या वस्तीकडे ढूंकूनही पाहत नाही.विजेची प्रतीक्षाचया वस्तीमध्ये अद्यापही विजेची व्यवस्था नाही.विशेष म्हणजे या वस्तीच्या बाजुलाच एक अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. मात्र या वस्तीकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सुध्दा याकडे भटकले नाही.शौचालयाचे केवळ खड्डेचया वस्तीमध्ये स्वच्छ भारत योजनेतंर्गत शौचालयासाठी खड्डे तयार करण्यात आले. पण त्यानंतर या विभागाचे अधिकारी या वस्तीकडे भटकलेच नाही. त्यामुळे वस्तीतील नागरिकांना अजुनही उघड्यावरच शौचास जावे लागत आहे.