शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

काय म्हणता, २ वर्षांत फक्त एकच विदेशी पर्यटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2022 05:00 IST

माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला आता या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सान्निध्याची गरज भासत आहे. यासाठी वनविभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, जंगलातील नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे जास्त दिसत आहे. 

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली व्याघ्र प्रकल्पात मोठ्या संख्येत विदेशी पर्यटक हजेरी लावत असतानाच येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २ वर्षांत फक्त एकाच विदेशी पर्यटकाने हजेरी लावल्याची माहिती आहे. यावरून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प प्रचार-प्रसारात कोठेतरी कमी पडत असल्याचे म्हणणे वावगे पडणार नाही. माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला आता या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सान्निध्याची गरज भासत आहे. यासाठी वनविभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, जंगलातील नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे जास्त दिसत आहे. जिल्हावासीयांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत असून येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते; मात्र शोकांतिका अशी की, राष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेले नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार-प्रसारा कोठेतरी कमी पडत असल्याचे दिसते. कारण या प्रकल्पात विदेशी पर्यटकांची हजेरी नावापुरतीच आहे. सन २०२०-२१ व २०२१-२२ या काळात प्रकल्पात एकाही विदेशी पर्यटकाने हजेरी लावली नसून सन २०२२-२३ मध्ये मे महिन्यात जर्मन देशातील फक्त एका विदेशी पर्यटकाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा प्रकल्पाला देशातील नावाजलेले व्यक्ती भेट देतात. शिवाय मोठ्या संख्येत विदेशी पर्यटकांचाही यात समावेश असतो. लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली प्रकल्पातही मोठ्या संख्येत विदेशी पर्यटक येतात. नागपूर येथील विमानतळावर विदेशी पर्यटकांचे आगमन झाल्यानंतर त्यांना गोंदिया होत कान्हा केसली हाच सोयीचा मार्ग ठरतो. शिवाय, नागपूर येथून गोंदिया अत्यधिक जवळ असूनही ते नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट न देता इतरत्र जात आहे ही शोकांतिका आहे. वनविभागाने यावर मंथन करण्याची गरज आहे. 

३ महिन्यात १२५५६ पर्यटकांची भेट - कोरोनामुळे सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये व्याघ्र प्रकल्प ऐन हंगामातच बंद ठेवावे लागले होते. त्यानंतर आता सन २०२२-२३ मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू असून त्यातही ऐन हंगामात सुरू असल्याने मार्च, एप्रिल व मे या ३ महिन्यांत व्याघ्र प्रकल्पात १२५५६  पर्यटकांनी जंगल सफारी केली आहे. यासाठी २३४३ वाहनांना प्रवेश देण्यात आला असून वन्यजीव विभागाला तब्बल २६,९२,५०० रुपयांचे उत्पन्न आले आहे.  

टॅग्स :tourismपर्यटनNagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्प