शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
5
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
6
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
7
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
9
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
10
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
11
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
12
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
13
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
14
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
17
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
18
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
19
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
20
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा

पोलिसांच्या कर्तव्यातील फिटनेसचे काय?

By admin | Updated: May 23, 2014 23:59 IST

आमगाव पोलीस सध्या खूप प्रसिद्धीच्या माध्यमातून पेट्रोल बचतीकडे लागले आहेत. नव्यानेच रूजू झालेल्या पोलीस निरीक्षकांनी सायकलसह पोलिसांची टिम तयार केली. निरोगी शरीर ठेवण्यासाठी सायकलिंग आवश्यक आहे,

ओ.बी.डोंगरवार - आमगाव

आमगाव पोलीस सध्या खूप प्रसिद्धीच्या माध्यमातून पेट्रोल बचतीकडे लागले आहेत. नव्यानेच रूजू झालेल्या पोलीस निरीक्षकांनी सायकलसह पोलिसांची टिम तयार केली. निरोगी शरीर ठेवण्यासाठी सायकलिंग आवश्यक आहे, तसेच फिटनेसही राहतो, असे सांगून त्यांनी पेट्रोल बचतीचा संदेश दिला. मात्र आरोग्याच्या फिटनेससोबत पोलिसांच्या कर्तव्याचा फिटनेसही ते सांभाळतील का, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. सध्या नगरातील रात्रीची पेट्रोलिंग म्हणजे गस्त बंद आहे. ज्या गल्लीबोळातून अगोदरच्या पोलीस निरीक्षकाच्या काळात पेट्रोलिंग सुरू होती ती सध्या पूर्णपणे बंद झाली आहे. आता नगरात पोलिसांची टिम खरोेखरच सायकलिंगवर पेट्रोलिंग करणार काय? व किती दिवस नगरात ही पेट्रोलिंग सायकलवर चालणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र पोलिसांच्या कर्तव्यात फिटनेस नाही. ते नापास झाले आहेत. अधिकारी मात्र आपल्याच पोलिसांचा पक्ष घेवून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. मग तो अधिकारी लहान असो की मोठा. बंदीसाठी सर्वच एकत्र येतात. मात्र वर्दी घालून किंवा तिच्या नावावर जो गोरखधंदा सुरू आहे त्याचे काय? तिथे फिटनेस नाही. अनेक गावात अनेक अवैध धंदे सुरू आहेत. ज्या धंद्यामुळे गावातील वातावरण दुषित होते. विपरित घटना घडतात. त्या अवैध व्यवसायात फिटनेस नाही. तेथे पोलीस नापास आहेत. याची एक नाही अनेक उदाहरणे आहेत. ‘धनीराम’मध्ये आमगाव पोलीसांचा पूर्णपणे फिटनेस आहे. कोठून किती घ्यायचे कोणाला, कोणत्या प्रकरणात कोणती केस लावून अडकविणे यात येथील पोलीस पूर्णपणे फिट आहेत. यापेक्षा संध्याकाळी पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर तैनात अनेक पोलीस सोमरसात फिट असतात. तेही वर्दीवर राहून ही कामे होतात. तेव्हा इतर वरिष्ठ अधिकार्‍यांना वर्दीची आठवण होत नाही. किंवा जो पोलीस ड्युटीवर सोमरसात असतो त्याची कधी मेडीकल झाली नाही. किंवा साधे कारण दाखवा नोटीस देण्यात आली नाही. तुम्ही कितीही फिटनेससाठी सायकलिंग केले तरी सोमरसात पेटी वाढणारच हे तेवढेच सत्य आहे. वेळेवर भोजन न मिळणे, टेंशन असे सांगून एकंदरित पोलिसांना वाचविण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल. मराठीत ताकाला जाणे व भांडे लपविणे असा हा प्रकार आहे. मात्र मन निरोगी नाही तर फिटनेस राहणार कसा याचा विचार कधीच वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला नाही. एका बाजूला आरोग्य व प्राणायम शिबिर घेवून सुदृढ राहणे यावर विशेष भर दिला जातो. मात्र एका बाजूला हे करीत असताना सायकलचा सोमरस बंद झाला नसल्याने कितीही फिटनेससाठी आखडपाखड केले तरी त्याचा उपयोग काही होणार नाही. आता खरोखर आमगाव पोलीस पेट्रोलची बचत करणार काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सध्या नवीन पोलीस निरीक्षकाच्या काळात गावागावात हुतूतू सुरू आहे. तेथे खो देण्याचा प्रयत्न केला गेला नाही. जनतेत गावागावात आक्रोश वाढला आहे. विनाकारण खाकी वर्दीचा धाक दाखवून चमकविणे सुरू आहे. जे मनोरंजनासाठी पत्ते खेळतात त्यांना पोलीस गाडीत डांबून ठाण्यात आणले जातो व काही वेळानंतर सोडले जातो. हा कसला प्रकार म्हणावा लागेल. मोठे जुगार खेळणारे राजरोसपणे आपल्या गुप्त ठिकाणी बसून दिवसरात्र पत्ते खेळतात. लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाही झालेली दिसत नाही. येथे पोलिसांची फिटनेसता दिसत नाही. गरीब मनोरंजनासाठी खेळतात त्यांच्यावर वर्दीचा धाक दाखवून कारवाही व मोठे गर्भश्रीमंत गुप्त जागी बसून खेळतात त्यांच्यावर कारवाही नाही. अवैध दारू, सट्टा, चोरी व इतर गुन्हेच्या तीन-चार महिन्यात खूप वाढले तेथे फिटनेसपणा नाही. या व्यवसायावर प्रथम अंकुश लावणे आवश्यक आहे. नवीन पोलीस निरीक्षकांनी या अवैध व्यवसायावर अंकुश लावण्यासाठी वेळकाढूपणा करणे करणे म्हणजे वर्षाची आणबान राहणार काय? जर तालुक्यात जुन्या पोलिस निरीक्षकाच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले तर आमगाव पोलीस पूर्णपणे फिट राहतील. अन्यथा कितीही सायकलींग केली व फोटो काढले तरी जे व्हायचे तेच होईल.