शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

स्वागताधिकारी कार्यालय ठरले शोभेचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:49 PM

येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे.

ठळक मुद्देगरज नसतानाही क र्मचाऱ्यांची फौज : कर्मचाऱ्यांच्या पगारावर नाहक कोट्यवधींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे. यातून स्वागताधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर वेतनासह वर्षाला कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. पर्यटन संकुलाचीच दुरवस्था झाल्याने या कार्यालयाचा अट्टाहास कशाला? असा प्रश्न नवेगावबांध फाऊंडेशनचे उपस्थित केला आहे.या पर्यटन संकुल परिसरात सन १९७५ ते १९९१ पर्यंत प्राणी संग्रहालय व त्यानंतर अनाथालय अस्तित्वात होते. सन १९९१ नंतर या अनाथालयातील प्राण्यांची सुटका करुन त्यांना राखीव जंगलात सोडण्यात आले. सन २०१२ पर्यंत या अनाथालयात दोन बिबट असल्याने चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. सन २०१२ नंतर वन्यजीव संरक्षण विभागाने पर्यटन संकुल परिसरातील लॉगहट विश्रामगृह वगळून डॉरमेंट्री, हॉलीडे होम, प्राणी अनाथालय परिसर, संजयकुटी विश्रामगृह, हिलटॉप गार्डन, बालोद्यान, तंबू निवास, मनोहर उडान हे सर्व वनविकास महामंडळाला हस्तांतरित केले.त्यामुळे सन २०१२ नंतर वन्यजीव संरक्षण विभागाकडे एकमेव लॉगहट विश्रामगृह उरले होते. त्यामुळे इतके कर्मचारी व एका स्वतंत्र कार्यालयाची गरजच काय? असे म्हणण्याची पाळी आता आली आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काही कामच नसल्यामुळे सुस्त झाले असून स्वागताधिकारी कार्यालय शोभेचा पांढरा हत्ती ठरला आहे. दुसरीकडे वन्यजीव संरक्षण विभागाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या राष्ट्रीय उद्यान संरक्षीत विभागात अनेक पदे रिक्त आहेत. तेथील कार्यरत कर्मचारी व अधिकाºयांना अतिरिक्त कार्यभार सांभाळतांना तारेवरची कसरत करावी लागते.तर एक स्वागताधिकारी, दोन वनरक्षक, एक स्वयंपाकी, दोन माळी व चार चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या वेतनावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन यांचे लाड पुरविले जातात. यावर फाऊंडेशनने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. एक बालोद्यान सोडले तर संपूर्ण पर्यटन संकुलाची दुरवस्था झाली आहे. शासन कर्मचाºयांच्या पगारावर कोट्यावधींचा खर्च करतो तर विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.या कार्यालयाद्वारे विश्रामगृहाची डागडुजी करणे, संजयकुटी डॉरमेंट्री व लॉगहट या विश्रामगृहांचे आॅफलाईन बुकींग करणे तसेच या कार्यालयातील कर्मचाºयांचे वेतन काढणे एवढेच काम आहे. विश्रामगृहाच्या डागडुजीचे कामही आता राष्ट्रीय उद्यान (संरक्षण) विभागच करीत आहे.सदानंद अवगानवनक्षेत्राधिकारी, स्वागताधिकारी कार्यालय राष्ट्रीय उड्डान पर्यटन संकूल नवेगावबांध

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य