सुवर्णा हुबेकर : पंचशील हायस्कूलमधील महिला मेळावासालेकसा : मुलगा झाला तर आनंद साजरा केला जातो. त्याचप्रमाणे मुलीचा जन्म झाल्यास त्याचे सुद्धा स्वागत करा असे आवाहन बाई गंगाबाई रूग्णालय गोंदिया येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले. त्या मक्काटोला येथील पंचशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या.पंचशील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.डी. मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुवर्णा हुबेकर, जि.प. सदस्य लता दोनोडे, एम.बी. पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.एस.व्ही. भुरे, मक्काटोलाच्या सरपंच आशा खांडवाये, बाम्हणीच्या सरपंच विद्या सिंगाडे उपस्थित होत्या. सुरुवातीला विद्येची देवी माता सरस्वती आद्याशिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला पुष्पांजली वाहण्यात आली. दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रा.एस.व्ही. भुरे म्हणाल्या की, कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास न करता त्या गोष्टीची सत्यता जाणने आवश्यक आहे. आपल्या समाजात महिला वर्ग चुकीच्या व भ्रमित करणाऱ्या गोष्टीवर आधी विश्वास करतात याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. मुलींच्या संगोपणात मातेची भूमिका सर्वात महत्वाची असते त्यासाठी महिलांनी महिलांची भ्रृणहत्या करू नये, असे आवाहन जि.प. सदस्य लता दोनोडे यांनी केले. महिला संबंधी वेळोवेळी होणाऱ्या आयोजनाचे लाभ माता-पालकांनी व मुलींनी घेत राहावे, महिलांच्या सन्मानासाठी हे कार्यक्रम असल्याचे प्राचार्य व्ही.डी. मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डी.एस. रोकडे यांनी केले. आभार एस.एम. उके यांनी मानले. यात सर्व शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)
मुलीच्या जन्माचे स्वागत करा
By admin | Updated: February 8, 2016 01:54 IST