शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

९ कर्मचाऱ्यांवर आरोग्य केंद्राचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:08 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २८ पदे मंजूर आहेत. मात्र रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने ९ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण आरोग्य केंद्राचा भार आला आहे. त्यामुळे आरोग्य केंद्र सलाईनवर असून आरोग्यसेवा खोळंबली आहे.

ठळक मुद्देगोठणगाव आरोग्य केंद्र : केंद्रात २८ पदे मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोठणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २८ पदे मंजूर आहेत. मात्र रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने ९ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण आरोग्य केंद्राचा भार आला आहे. त्यामुळे आरोग्य केंद्र सलाईनवर असून आरोग्यसेवा खोळंबली आहे.प्राप्त माहितीनुसार, सन २०१७-१८ मध्ये आरोग्य केंद्रातील २८ मंजूर पदांपैकी १८ पदे भरण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये डॉ. खोब्रागडे व डॉ. बघेले यांची बदली करण्यात आली. त्यामुळे डॉ. आशिष बोदेले यांच्यावर ३ उपकेंद्र व ओपीडीची जबाबदारी आली. त्यातच शासकीय काम, कार्यालयीन सभा, शालेय आरोग्य तपासणी इत्यादी कामांचा भार वाढला. परिणामी, रुग्णांना आरोग्य सेवा देणे कठीण झाले. प्रयोशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माण अधिकारी यांची सुद्धा बदली करण्यात आली. यामुळे तपासणी व औषध वितरण सेवा कोलमडली व एका आरोग्य सेवीकेवर औषध वितरणाचे काम आले आहे. ५ अंशकालीन आरोग्य सेविकांची नियुक्त सुद्धा करण्यात आली नाही.केंद्रातील तीन उपकेंद्र वाऱ्यावरप्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गोठणगाव, प्रतापगड व बाराभाटी उपकेंद्र येतात. बाराभाटी उपकेंद्रामध्ये डॉ. बघेले होते. त्यांची बदली झाल्याने जागा रिक्त आहे. शिवाय, शासनाकडून औषध पुरवठा नसून रुग्णांना वंचीत राहावे लागत आहे. प्राथमिक आरोग्य समितीच्या अध्यक्ष जि.प.सदस्य रचना गहाणे आहेत. त्यांना आरोग्य केंद्राकडे लक्ष केंद्रीत करुन रिक्त असलेले पद भरण्याची व औषध पुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य