शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विवाह सोहळे सामाजिक एकतेला पोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:59 IST

सामुहिक विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने समाजातील सर्व लोक एकत्रित येवून त्यांच्यात आपुलकी व स्नेह वाढते. यातूनच समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. त्यामुळे सामुहिक विवाह सोहळे सामाजिक एकतेला पोषक ठरत असून अशा आयोजनांसाठी समाजातील जबाबदार लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ......

ठळक मुद्देआमदार पुराम यांचे प्रतिपादन : हलबा-हलबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सामुहिक विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने समाजातील सर्व लोक एकत्रित येवून त्यांच्यात आपुलकी व स्नेह वाढते. यातूनच समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. त्यामुळे सामुहिक विवाह सोहळे सामाजिक एकतेला पोषक ठरत असून अशा आयोजनांसाठी समाजातील जबाबदार लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.तालुक्यातील ग्राम हलबीटोला येथे हलबी-हलबा समाजाच्यावतीने आयोजीत सामुहिक विवाह सोहळयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.एन.डी.किरसान होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री भरत बहेकार, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव सहषराम कोरोटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रावण राणा, महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे, नगर पंचायत उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, भाजप महामंत्री राजेंद्र बडोले, पंचायत समिती सभापती अर्चना राऊत, विवाह समितीचे अध्यक्ष मुलचंद गावराणे व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावती यांच्या छायाचित्राला अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी आ. पुराम यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले विचार मांडताना सामुहिक विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे सांगून यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैशांचा अपव्यय थांबतो व कर्जबाजारीपणापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते असे मत व्यक्त केले.प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष मुलचंद गावराने यांनी मांडले व दरवर्षी होणाऱ्या हलबा हलबी समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ््याचा आढावा सादर केला.संचालन राजेश भोयर यांनी केले. कार्यक्रमासाठी समितीच्या सर्व पदाधिकाºयांनी सहकार्य केले.जोडप्यांना भेट वस्तुचे वाटपहलबा-हलबी समाजाच्यावतीने आयोजीत या सामुहिक विवाह सोहळ्यात आठ जोडप्यांना परिणय सुत्रात बांधण्यात आले. यानंतर समितीच्या वतीने या जोडप्यांना भांडी व इतर भेट वस्तु आ. पुराम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. परिणयबद्ध झालेल्या या जोडप्यांना आर्शिवाद देण्यासाठी मोठ्या संख्येत हलबा-हलबी समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :marriageलग्न