शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

लग्नाचा बार उडविला धूमधडाक्यात! चार वधुपित्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST

५ एप्रिल रोजी सायंकाळी आमगाव तालुक्याच्या बोथली येथील एका लग्नसमारंभावर १० हजारांचा दंड ठोठावला. खुर्शीपार येथेही १० हजाराचा दंड ठोठावला. बासीपार येथील वधुपित्यालाही दहा हजाराचा दंड व ठाणा येथील एका वधुपित्यावर २३ मार्च रोजी १० हजार रुपये दंड करण्यात आला. त्या दंडाची रक्कम त्याच ग्रामपंचायतींना देण्यात आली.

ठळक मुद्देचार गावांतील चौघांना प्रत्येकी १० हजाराचा दंड : खंडविकास अधिकारी व ठाणेदाराची संयुक्त कारवाई

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  लग्न म्हटले की आताही धामधूम होत आहे. लग्नसमारंभात जणू कोरोनाला निमंत्रण देण्याचे काम केले जात आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ना कारवाईची भीती ना दंडाची भीती अशी स्थिती सद्यस्थितीत सुरू असलेल्या लग्नसमारंभातून दिसून येते. लग्नसमारंभात ५० पेक्षा जास्त संख्या नसावी असे जिल्हा प्रशासनाने पत्रही काढले असून याचे उल्लघंन करणाऱ्या चार वधू पालकांना आमगावच्या खंडविकास अधिकारी व ठाणेदार यांनी दंड केला आहे. ५ एप्रिल रोजी सायंकाळी आमगाव तालुक्याच्या बोथली येथील एका लग्नसमारंभावर १० हजारांचा दंड ठोठावला. खुर्शीपार येथेही १० हजाराचा दंड ठोठावला. बासीपार येथील वधुपित्यालाही दहा हजाराचा दंड व ठाणा येथील एका वधुपित्यावर २३ मार्च रोजी १० हजार रुपये दंड करण्यात आला. त्या दंडाची रक्कम त्याच ग्रामपंचायतींना देण्यात आली. ही कारवाई आमगावचे खंडविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, ठाणेदार सुभाष चव्हाण, विस्तार अधिकारी एल.एम. कुटे, आरोग्य विस्तार अधिकारी झाडे यांनी केली. कारवाईमुळे भीती निर्माण झाली आहे. 

५०पेक्षा अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीने कारवाई कोरोना प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी लग्नसमारंभ व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी उपस्थितीची मर्यादा घालून दिली आहे. या नियमावलीकडे दुर्लक्ष करून परवानगीशिवाय साखरपुडा व लग्नसोहळ्याचे कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू होते. ही बाब समजल्यानंतर खंडविकास अधिकारी, ठाणेदार यांच्या भरारी पथकाने थेट लग्नमंडप गाठून वधुपित्यांना प्रत्येकी दहा हजार दंड ठोठावला. 

शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांच्या अधीन राहून आपले कार्यक्रम शांततेत केल्यास आनंद अजून व्दिगुणीत होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. दंड करून आम्हाला आनंद हाेत नाही. सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.- चंद्रकांत साबळे, खंडविकास अधिकारी, आमगाव

सरपंच व ग्रामसेवक कारवाई करीत नाहीचारही कार्यक्रम वेगवेगळ्या वस्त्यांवर सुरू होते. एका ठिकाणी मंगलाष्टके होऊन वधू-वर विवाह बंधनात अडकले होते. दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होता. तिसऱ्या ठिकाणी स्वागत समारोह होता, तर चौथ्या ठिकाणी लग्न होते.  कोरोना प्रतिबंधक समितीचा गावचा प्रमुख सरपंच व सचिव ग्रामसेवक असल्याने त्यांनीच कारवाई करायला हवी. परंतु सरपंच आपले मत खराब होऊ नये म्हणून कारवाईला टाळतात. तर ग्रामसेवकाला गावात काम करायचे असल्याने ते कारवाई करीत नाही. परिणामी खंडविकास अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागते.

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या