शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

पावसाअभावी पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

पाऊस लांबल्यामुळे धाबेपवनी या आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त परिसरातील धानपिके धोक्यात आली आहेत. तर अर्ध्याहून अधिक धान पिकाची रोवणी खोळंबल्या आहेत. आता जर पाऊस आला नाही तर या परिसरातील शेतकऱ्यांना धानपिक घेण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या धानाची रोवणी झालेली आहे ते शेतकरी आपले धानपिक वाचिवण्यासाठी आटापिटा करीत आहेत.

ठळक मुद्देदोन्ही नक्षत्र कोरडेच : शेतमजुरांवर बेरोजगारी पाळी, पिके वाचविण्यासाठी सुरू आहे शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : जिल्ह्यात मागील महिनाभरापासून दमदार पाऊस न झाल्याने पऱ्हे  आणि केलेली रोवणी सुध्दा वाळण्याच्या मार्गावर आहे. विहिरी, बोअरवेल आणि सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने पऱ्हे व रोवणी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.एकंदरीत पावसाअभावी कोरडा दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पाऊस लांबल्यामुळे धाबेपवनी या आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त परिसरातील धानपिके धोक्यात आली आहेत. तर अर्ध्याहून अधिक धान पिकाची रोवणी खोळंबल्या आहेत. आता जर पाऊस आला नाही तर या परिसरातील शेतकऱ्यांना धानपिक घेण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.ज्या शेतकऱ्यांच्या धानाची रोवणी झालेली आहे ते शेतकरी आपले धानपिक वाचिवण्यासाठी आटापिटा करीत आहेत. तर ज्यांची पावसाअभावी रोवणी झाली नाही ते रोहिणी कधी होणार या चिंतेत आहे. पाण्याची पातळी खालावल्यामुळे शेतीला विहिरी किंवा पंपाद्वारे पाणी देणे सुध्दा कठीण झाले आहे. ५ जुलैला लागलेल्या पुष्य नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे धानाची रोवणी अर्धवट आहेत. १९ जुलैला लागलेला पुनर्वसू नक्षत्र कोरडाच गेला. कान्होली, रांजीटोला, कोहलगाव, जब्बारखेडा, पवनी, तिडका, एरंडी, झाशीनागर, भसबोळन, जांभळी, येलोडी, रामपुरी,धाबेटकडी, चुटिया या आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त गावांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे.कोरोना कालावधीत बेरोजगार झालेले हात शेतीच्या कामात गुंतले असताना पावसाने पाठ फिरविल्याने मिळालेला रोजगार हिरावला आहे. एकीकडे शेतकरी पावसाअभावी संकटात सापडला तर दुसरीकडे दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेत आकशाकडे लागल्या आहेत. मजुरांचे कामाअभावी हाल होत आहेत. दमदार पाऊस न झाल्यामुळे तलाव, बोड्या, नाले सर्व कोरडे पडले आहेत. त्यामुळे सिंचनाचा गंभीर प्रश्न या परिसरात निर्माण झाल्याचे कान्होली येथील शेतकरी महेंद्र रहिले यांनी सांगितले.पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचा नजरायंदा पावसाने भरपूर ओढ दिल्याने पिकांवर ताण निर्माण झाला आहे. तर पावसाअभावी मोठ्या प्रमाणात रोवणी खोळंबली असून केलेली रोवणी सुध्दा वाळत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ४५ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना पिकांना मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा स्थिती ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्या शेतकºयांना मदत मिळणार का याकडे सुध्दा शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.सिंचन प्रकल्प पडले कोरडेमागील पंधरा दिवसांपासून या परिसरात पाऊस झाला नाही. परिसरात सिंचनाची व्यवस्था नाही. तलाव नाही बोड्या नाही. या परिसरात दूरवरच्या बाजूला इटियाडोह धरण तर इकडे खालच्या बाजूला नवेगावबांध जलाशय आहे. या दोन्हीतून शेतीला प्रत्यक्ष सिंचन होत नाही. त्यामुळे हातातील पीक तर जाणार नाही ना? धानाची रोवणी होणार की नाही ही चिंता बळीराजाला सतावत आहे. शेतकरी आटापिटा करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.झाशीनगर उपसा सिंचन योजनेने केली निराशाइटियाडोह धरणाचे पाणी उपसा करून परिसरात शेतीसाठी पाणी देण्याचा महत्त्वाकांक्षी झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्प राजकारणामुळे अद्यापही पूर्ण झालेला नाही. झाशीनगर उपसा सिंचन योजना मार्गी लावली जाईल असे आश्वासन अनेकांनी दिले पण हा प्रकल्प अद्यापही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका या परिसरातील शेतकºयांना बसत आहे.

टॅग्स :agricultureशेती