शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

‘कोकिळ’ नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: April 28, 2016 01:42 IST

वसंत ऋतूत कानी पडणारा सुमधूर व मन प्रसन्न करणारा कोकिळेचा आवाज सर्वांना भुरळ घालत असतो.

गोंदिया : वसंत ऋतूत कानी पडणारा सुमधूर व मन प्रसन्न करणारा कोकिळेचा आवाज सर्वांना भुरळ घालत असतो. रोज सकाळी कानावर पडणारा हा आवाज सायंकाळी ७ वाजेपर्यंत ऐकावयास मिळत असल्याने रुक्ष वाटणाऱ्या उन्हाळ्यात या स्वरामुळे आनंद मिळत असल्याने मन आल्हाददायक असते. मात्र मंजूळ आवाजाचा हा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ‘कपुकयुलिडी’ कुळातील कोकिळ पक्षी भारतात आढळतो. कावळ्याएवढाच पण थोडा सडपातळ असणाऱ्या या पक्ष्याचे सध्या सर्वत्र दर्शन होत आहे. जसजसा दिवस चढत जातो तसतसा कोकिळेच्या स्वराला साज चढतो. ग्रामीण भागात रस्त्याचच्याकडेला वड, पिंपळ व अमराईतून येणारा कोकिळेचा मधूर स्वर अनेकांना भूरळ घालत आहे. कोकिळ पक्ष्यांचे वैशिष्टय म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच तिला कुठ फुटतो आणि ती गाऊ लागतो. श्रावण महिन्यापर्यंत तिचे गाणी ऐकू येते. हिवाळ्यात मात्र हा पक्षी मौन बाळगतो. मादी कोकिळेला गाता येत नाही. तर कोकिळा हा त्याचा पंचम स्वरामुळे अत्यंत लोकप्रिय व आवडता पक्षी आहे. पंचम स्वरातील कोकिळेची आर्तता ऐकणाऱ्याला दुभावते. गितकारांनी व लावणी लिहिणाऱ्यांनी कोकिळ पक्षावर भरभरुन लिहिले आहे. कवी व लेखकांनी आपल्या साहित्यातून कोकिळेचा मधूर स्वर व प्रभाव याचे वर्णन केले आहे. हिंदी या मराठी चित्रपटगीतात कोकिळेच्या मधूर स्वराचा गोडवा गायीला जातो. या पक्षाचे दुसरे वैशिष्टय म्हणजे हा पक्षी अधीही आपले घरटे बांधत नाही. मादा कोकिळ कावळ्याच्या घरट्यात अडी घालते व त्याच घरट्याजवळ लपून बसते. कोकिळ व कावळा यांचे वैर असल्याने कावळा त्यावर तुटून पडतो. तेव्हा कोकिळा कावळ्याला हुलकावण्या देत कावळ्याला घरट्यापासून दूर नेते. यादरम्यान मादा कोकिळ कावळ्याच्या घरट्यात अंडे पाहून तर कोकिळेला काम फत्ते झाल्याचे कळते. अशा प्रकारे कोकिळ कावळ्याचा खेळ चालतो.पिलं बाहेर पडल्यावर कावळेच कोकिळेच्या पिलाचे पालन करतात. पिल्ले जगण्यास सक्षम झाली की, मग त्यांचा कावळ्यांशी संबंध राहत नाही, ती उडून जातात. ग्रामीण भागात कोकिळेचा मधूर स्वर नेहमीच निनादतो. प्रदूषणांचा फटका कोकिळ पक्ष्यांना सुद्धा बसत आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याची चिंता पक्षीप्रेमींना लागली आहे. दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या कोकिळांच्या प्रमाणामुळे जनता आता तिच्या मंजूर स्वरांच्या आस्वादाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)