जलमय : गुरूवारी व शुक्रवारी शहरात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर शहरातील रस्ते असे जलमय झाले होते. रस्त्यावर पाणी साचण्याची ही समस्या अवघ्या शहरातच आहे. यात सिव्हील लाईन्स परिसरात मात्र काही जास्तच प्रमाणात जलमय रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे रस्ते उखडून आता त्यावर खड्डे ही पडू लागले आहेत. असाच प्रकार शुक्रवारीही दिसून आला. पावसानंतर सिव्हील लाईन्स परिसरातील रस्त्यांवर पाणी चांगलेच साचले. यात पहिल्या छायाचित्रात मामा चौककडे जाणारा रस्ता तर दुसऱ्या व चिसऱ्या छायाचित्रात हनुमान चौकातील हा मुख्य रस्ता असा पाण्याखाली गेला. नागरिकांना मात्र या पाण्यातूनच आपली वाट काढावी लागते. पावसाचे हे पाणी कित्येकदा लोकांच्या घरातही शिरते.
जलमय :
By admin | Updated: July 23, 2016 02:11 IST