लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील न्यू लक्ष्मीनगर परिसरातील बालाजी कॉम्प्लेक्सच्या बाजूच्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी नाल्याचे पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे मात्र परिसरात कीटकजन्य आजाराच्या समस्येत वाढ झाली आहे. पाणी तुंबले असल्याने तेच पाणी विहिरी व बोअरवेलमध्ये जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नाल्यातील पाणी त्वरीत सोडण्याची मागणी नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. न्यू लक्ष्मीनगर येथील नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे कंत्राटदार कदम यांनी नाल्याचे पाणी अडविले आहे. मागील पंधरा दिवसांपासून नाल्याचे पाणी तुंबल्याने परिसरात डासांच्या समस्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नाल्याच्या बाजूला राहत असलेल्या परिवारातील सदस्य आजारी पडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. करिता नाल्यातील पाणी त्वरीत सोडण्याची मागणी परिसरातील विनोद ठवकर, अंकुश वर्मा, गणेश डोये, किशोर साहू, कुंवरलाल तुरकर, संजय गुडधे, राकेश ठाकरे, अमित येडे, मनोहर सराटकर, शशिकला वर्मा, पुष्पा डोये, सचिन वाघमारे, बंडू पडूलकर, इश्वर सहारे, शितल बोपचे, कमलेश विश्वकर्मा आदिंनी केली आहे.पुलाच्या बांधकामासाठी अडविले पाणीया प्रकाराराबाबत संबंधीत कंत्राटदाराला विचारणा केली असता नाल्यावर पुलाचे बांधकाम करावयाचे आहे. पाण्यात हे काम करणे शक्य नसल्यामुळे नाल्याचे पाणी अडवावे लागल्याचे सांगीतले. परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी लवकरात लवकर काम करण्याचे प्रयत्न असून काम होताच पाणी सोडले जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. मात्र तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले. दरम्यान या प्रकारामुळे शहरातील स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नाल्याचे पाणी बोअरवेल व विहिरीमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 21:52 IST
शहरातील न्यू लक्ष्मीनगर परिसरातील बालाजी कॉम्प्लेक्सच्या बाजूच्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी नाल्याचे पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे मात्र परिसरात कीटकजन्य आजाराच्या समस्येत वाढ झाली आहे.
नाल्याचे पाणी बोअरवेल व विहिरीमध्ये
ठळक मुद्देन्यू लक्ष्मीनगरातील प्रकार : नाल्यातील पाणी सोडण्याची मागणी