शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पाणी पुरवठा योजना आता सौर उर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:59 IST

थकीत वीज बिलापोटी पाणी पुरवठा योजनांची वीज जोडणी कापली जाते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. हा प्रकार थांबावा. यासाठी तालुक्यातील ४० पाणी पुरवठा योजनांना सौर उर्जेची जोड देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआमदार अग्रवाल यांची संकल्पना : रोल मॉडेल म्हणून राज्यभरात अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : थकीत वीज बिलापोटी पाणी पुरवठा योजनांची वीज जोडणी कापली जाते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. हा प्रकार थांबावा. यासाठी तालुक्यातील ४० पाणी पुरवठा योजनांना सौर उर्जेची जोड देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. पाणी पुरवठा योजनांना सौर उर्जेची जोड देण्याचा आ. गोपालदास अग्रवाल यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुध्दा भावला असून त्यांनी याची राज्यभरात अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली. लवकरच यासंबंधीचे आदेश काढण्यात येणार आहे.नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या विविध विषयांची माहिती देण्यासाठी रविवारी (दि.१५) आ.अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पिंडकेपार येथील सिंचन प्र्रकल्पाबाबत माहिती देताना आमदार अग्रवाल म्हणाले, प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करायची आहे. यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षीत आहेत. यापूर्वी निधीची मागणी केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या डिसेंबर महिन्यात नियोजन करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगीतले. रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेसाठी निधीची गरज असून मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केल्याचेही सांगीतले. शहरातील मेडीकल कॉलेज, जिल्हा परिषद अन्य विभागांतील रिक्त पदे भरण्याचीही मागणी सुध्दा मुख्यमंत्र्यांकडे केली असून ती सुध्दा लवकरच मार्गी लागणार आहे.शहरातील सीसीटिव्हीच्या विषयांत जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी प्रस्ताव पाठविल्याची माहिती दिली. मनोहर चौकातील पोलीस कॉलनीसाठी २९ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे.रावणवाडी, गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्यांच्या इमारतीसाठी निविदा काढण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून लवकरच ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.कालव्यांच्या दुरूस्तीसाठी १३० कोटींची मागणीगोंदिया तालुक्यातील १ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून १९० किमी लांबीच्या कालव्यांच्या दुरूस्तीचे काम केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असता त्यांनी आश्चर्य व्यक्त केल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले. खरीपाचा हंगाम तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यांना घेता यावा. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आणखी १३० कोटींची मागणी केली आहे. सालेकसा, आमगाव व गोंदिया तालुक्यातील कालव्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे.पावसाळ््यानंतर हे काम सुरू होणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.गोंदिया शिक्षण संस्था ‘कॅम्पस’ देण्यास तयारमागील सुमारे ३० वर्षांपासून सुरू असलेले एमआयटी इंजिनीयरींग कॉलेज तोट्यात असल्याने गोंदिया शिक्षण संस्थेने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही गोंदियात शासकीय इंजिनीयरींग कॉलेजची मागणी केली आहे. याबबत गोंदिया शिक्षण संस्थेच्या पदाधिकाºयांसोबत बोलणे झाले असून त्यांनी शासकीय इंजिनीयरींग कॉलेजची इमारत तयार होईपर्यंत त्यांचे ‘कॅम्पस’ देण्याची तयारी दर्शविली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. त्यामुळे पुढील वर्षापासून इंजिनीयरींग कॉलेज सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.१५ आॅगस्टपासून प्रशासकीय इमारतीत कामकाजइमारत तयार होवून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रशासकीय इमारतीत येत्या १५ आॅगस्टपासून कामकाज सुरू होणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगीतले. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलाविले आहे. विशेष म्हणजे, जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर भाजीबाजार तयार करण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याचेही आमदार अग्रवाल यांनी सांगीतले. वैशिष्टपूर्ण योजनेतून चार कोटी तर कृषी विकास योजनेतून १.५० कोटी रूपयांच्या निधी यासाठी मंजूर झाला असल्याचे सांगितले.पीक विम्याचा विषय मार्गी लागणारपीक विम्याच्या विषयावर बोलताना आमदार अग्रवाल यांनी, लोकलेखा समितीने आपला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, पीक विम्याचा फायदा शेतकºयांना मिळत नाही. अशात ही योजनाच शासनाने बंद करावी किंवा त्यात शेतकऱ्यांच्या लाभाच्या दृष्टीने तरतूद करण्याची मागणी आहे. यासाठी पैसेवारी ग्रामपंचायत स्तरावरच काढण्याची मागणी केली आहे. असे केले तरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आम्ही पीक विम्याच्या विषयावर ठाम असून हा विषय नक्कीच मार्गी लावू असे अग्रवाल यांनी सांगितले.आयटीआयमध्ये चार नवीन अभ्यासक्रमसन १९६५ च्या सुमारास स्थापना झालेल्या आयटीआयमध्ये सुमारे ७०० जागा असून त्यासाठी दोन हजार अर्ज येतात. अशात येथील आयटीआयमध्ये आणखी चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी तसा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले आहेत. याच शैक्षणिक सत्रात हा अभ्यासक्रमाला मंजुरी मिळवून दिली जाणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगीतले. शिवाय इमारतही अत्यंत जर्जर असल्याने सर्व सुविधायुक्त नवी इमारत तयार करण्यासाठी तसा प्रस्तावही तयार करून पाठविण्याचे निर्देश आमदार अग्रवाल यांनी प्राचार्यांना दिले आहे.