शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतील गाळामुळे पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:21 IST

येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा बऱ्याच कालावधीपासून उपसा न केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष भोवले : शहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा बऱ्याच कालावधीपासून उपसा न केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.आमगाववासीयांना मागील महिनाभरापासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच शहराला पाणी पुरवठा करणाºया विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने मागील तीन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूूर्वीच स्थानिक प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज होती. पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा उपसा करण्याची गरज होती. मात्र याकडे दुर्लक्ष करीत वेळ मारून नेल्याने त्याचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु वाढीव पाणी पुरवठा योजनेची क्षमता चार लाख लिटर आहे.मात्र शहराला सध्या केवळ २ लाख ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. दररोज जवळपास दीड लाख लिटर पाणी शहरवासीयांना कमी मिळत असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.गाळाचा उपसा करण्याकडे दुर्लक्षबाघ नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा योजनेची विहीर आता कालबाह्य झाली असून त्यातील गाळाचा स्थानिक प्रशासनाने अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पाणी टाकीची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यातच विहिरीतील गाळामुळे तीन दिवसांपासून शहराला होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. प्रशासनाने वेळीच उपाय योजना केली असती तर शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले नसते.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई