शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा सोडणार पुजारीटोलाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 21:57 IST

डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी (दि.११) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार असल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे.त्यामुळे यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या डांगोली येथील वैनगंगा नदीचे पात्र देखील यंदा एप्रिल महिन्यातच कोरडे पडले. त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी डांर्गोलीपासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मोठी मदत झाली. मात्र आता नदीपात्रात चार-पाच दिवसच शहराला पाणी पुरवठा ऐवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण होण्याचीे शक्यता आहे.या समस्येवर मात करण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.११) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. कालव्याव्दारे हे पाणी येत्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले तेव्हाच पाणी पोहचावे यासाठी व्यवस्था करण्यात आली. पहिल्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून साडे तीन एमएमक्यु पाणी सोडण्यात आले. तर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून बाघ सिंचन विभागाकडे १० एमएमक्यु पाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा पुजारीटोलाचे पाणी सोडून पाणी टंचाईवर मात केली जात आहे. त्यात आता पावसाळ््यापर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून व्यवस्था आली आहे. मात्र यासाठी पाणी सोडण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई